Crime 24 Tass

जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. वंसत जाधव यांना भारतीय पोलीस सेवा प्रदान

संत उत्तमराव जाधव जन्म ०२/०६/१९७२ रोजी पुणे जिल्हयात झाला

दिनांक १४/०१/२०२२ रोजी मा. पोलीस महासंचालक सा. म. रा. मुंबई यांनी निवड केलेले भारत सरकारचे गृह मंत्रालय अधिसूचना, १९५४, भारतीय पोलीस सेवा (पदोन्नतीद्वारे नियुक्ती ) विनीमय, १९५५ च्या नियमन ९ च्या उप-नियम (१) सह वाचलेले, राष्ट्रपतींनी महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक भंडारा श्री. वसंत जाधव यांना भारतीय पोलीस सेवेमध्ये समवुन घेण्यात आले.

श्री. वसंत उत्तमराव जाधव जन्म ०२/०६/१९७२ रोजी पुणे जिल्हयात झाला असुन महाराष्ट्र पोलीस दलात दिनांक ०१/१०/२००२ रोजी नायब बेसीपी नंतर प्रोबेशनरी डिवाएसपी नांदेड येथे सन २००३ ते २००४ या काळात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी एसडीपीओ पदाची पोस्टींग केली. २००५ ते २००८ पर्यंत धर्मबाद एसडीपीओ वर्ष २००८ ते २०१० या काळात फलटन (सातारा) त्यानंतर त्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक २०११ ते २०१४ दरम्यान भंडारा आणि उल्लासनगर (ठाणे) २०१४ २०१६ या कालावधी येथे कार्यरत होते. उपप्रा. कमिन्शनर ऑफ पोलीस, सशस्त्र पोलीस क्युआरटीटी नायगाव मुंबई सन २०१६ ते २०२० या कालावधीत ते दिनांक १९/०९/२०२० पासुन पोलीस अधिक्षक भंडारा म्हणुन कार्यरत आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक, श्री. वसंत जाधव यांनी भंडारा जिल्हयात मोठया प्रमाणात फोफावलेले अवैध धंदे

त्यामध्ये बंद जागेतील जुगार, सट्टा पटी, अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चाललेली तरुण पिढी अस्ताव्यस्त रहदारी व ग्रामीण भागात पोलीसाबद्दल असलेली नकारात्मक भावना यासारखे आव्हानेही मिळाली. अधिनिस्त अधिकारी / कर्मचारी यांचेशी योग्य समन्वय साधुन व सगळ्यांना पोलीस कर्तव्याची नव्याने जानीव करून देत जिल्हयातील गुन्हेगारीवर वचक बसविण्याकरीता नव्या दमाने कामास सुरुवात केली. अवैध धंदयानविरुध्द कडक मोहीम राबवुन भंडारा पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील सट्टा पट्टी व जुगाराचे, अमली पदार्थ असे अवैध धंदे संपुष्ठात आनले. त्यांच्या संकल्पनेतुन तयार केलेल्या कोरोना जनजागृती रथाच्या माध्यमातुन प्रत्येक ग्रामस्थांचा विश्वास बसेल. कारोना जनजागृती रथ तयार करण्यात आला. तसेच जिल्हयातील पुर्ण

अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना संबधात मास्क, सेनीटॉयझर, औषधीचे वाटप करण्यात आले


. तसेच नाविन्यपुर्ण संकल्पनेतुन जिल्हयातील सर्वसामान्य जनते करीता “फिरते पथक व दोन मार्शल पथकांचे” उपक्रम राबविण्यात आहेत. त्यांच्या हस्ते सदर “फिरते पथक व दोन मार्शल पथकांचे” उद्घाटन करण्यात आले. भंडारा जिल्हयात डायल ११२ चे पोलीस आपल्या दारी चे लोकार्पण करण्यात आले.

पोलीस अधिक्षक भंडारा श्री. वसंत जाधव जिल्हयात कार्यरत असतांना त्यांना पोलीस दलातील आयपीएस दर्जा मिळाला आहे

. पोलीस दलातील त्यांच्या कार्य तत्परतेमुळे यापूर्वी दिनांक २६/०१/२०२१ च्या प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उल्लेखनीय सेवेबद्दल गुणवत्तापूर्ण राष्ट्रपती पोलीस पदक मिळालेला आहे. त्यांना भारतीय सेवा मध्ये समवुन घेण्यात आल्या बद्दल श्री. अपर पोलीस अधिक्षक श्री. अनिकेत भारती व भंडारा जिल्हयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आनंद व्यक्त केले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]