• केली पाहणी : त्वरीत चौकशीची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा • जेसीबीने काढला पळ •
साकोली : येथील महामार्गापासून गडकुंभली रोड तहसिल कार्यालय व नविन पंचायत समिती रस्त्यालाच भ्रष्टाचाराचे ग्रहण फुटले, हि बाब निदर्शनास येताच येथील भाजपा शेतकरी नेते डॉ अजयराव तुमसरे यांनी घटनास्थळी धाड मारीत अंदाज पत्रक विचारले असता जेसीबीनी तेथून पळ काढला व काम बंद पाडीत याची चौकशीची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शहरातील गडकुंभली रोड नविन तहसिल कार्यालय, पंचायत समिती या रोडवर अनेक प्रशासकीय अधिकारी, राजनेते, आदिवासी नविन वस्तीगृहातील अधिकारी दररोज ये जा करतात मात्र याच मुख्य रोडवर अश्या भ्रष्टाचाराचे दर्शन बघून भाजपा शेतकरी नेते डॉ अजयराव तुमसरे संतापले व येथे घटनास्थळी जात सर्वांना अंदाजपत्रकाची मागणी केली त्याच क्षणी असे आढळले की प्रथम जीएसबी न करता वरून डांबरमिश्रीत दगडे टाकून थातूरमातूर काम सुरू होते, हि बाब त्वरीत दखल घेऊन भाजपा शेतकरी नेते डॉ अजयराव तुमसरे हे धडकले व याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करतात तेथील जेसीबीने पळ काढला, सदर मार्ग हा प्रशासकीय असून याची दखल व चौकशी करण्याची मागणी भाजपा जिल्हा शेतकरी नेते डॉ अजयराव तुमसरे यांनी केली आहे अन्यथा रस्त्यांवर उतरून आंदोलनाचा इशारा दिला.
