Crime 24 Tass

ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

मकर संक्रांत म्हणजे सर्व रुसवे-फुगवे विसरून सर्वांनी एकत्र येण्याचा सण तसेच या सणांमध्ये परिवर्तन करणे काळानुसार गरजेचे आहे असे वक्तव्य सौ.शिल्पा खंडाईत यांनी केले.

आपल्या परंपरेनुसार आपण विधवा स्त्रियांना या सणापासून दूर ठेवतो पण विधवा स्त्रियांना या सणांमध्ये समाविष्ट करून घेणे माणुसकीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे व आपण ती सुरुवात आपल्या पासूनच करायला पाहिजे त्याच प्रमाणे मकर संक्रांतीच्या सणाला विचारांचं वाण म्हणून पुस्तकांचे वाटप स्त्रियांनी करायला पाहिजे.प्रत्येक रूढी परंपरा जपत असताना पर्यावरणाची हानी आपल्याकडून होत तर नाही ना हा प्रश्न प्रत्येक स्त्रियांनी स्वतःला विचारायलाच हवा आणि आपल्या प्रत्येक सणा मधून आपण पर्यावरणाला हितावह कार्य करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक सांस्कृतिक वारसा जपताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे झालेले आहे आणि हेच प्रत्येक स्त्रीने स्वतःपासून सुरुवात करणे आणि आणि आपल्या कुटुंबापासून सुरुवात करणे हीच काळाची खरी गरज आहे असे मार्गदर्शन ओबीसी क्रांती मोर्चा महिला अध्यक्ष श्रीमती शोभाताई बावनकर यांनी केले.

आज दिनांक रविवार 23 जानेवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून ओबीसी क्रांती मोर्चा च्या महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ओबीसी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला संघटनेचे अध्यक्ष शोभाताई बावनकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.अतिथी सुनंदा धनजोडे,कल्पना चांदेवार,किरण मते, कल्पना नववखरे,श्वेता बावनकर, अश्विनी शिंदे,रागिनी झिंगरे,विशाखा गावंडे,मीना कांबळे,प्रेरणा ठोंबरे, प्रिया बारस्कर,अनिता बावनकुळे,मंगला बावनकुळे,पल्लवी मदनकर,शीला नागपुरे,शकुंतला गभणे,मीना ठवकर, सुरेखा कावळे,चंदा माकडे,मनीषा करेंजकर,लीना चव्हाण,उज्वला पोवळे,आदि ओबीसी क्रांती मोर्चाच्या महिला व पदाधिकारी उपस्थित होते.


महिलांनी एकजुटीने येऊन हा कार्यक्रम साजरा केला सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे प्रत्येक रूढी परंपरा जपत असताना पर्यावरणाची हानी कसे थांबवता येईल याकरिता महिलांनी आपल्या घराच्या परिसरात निदान एक तरी झाड लावावे हा प्रश्न प्रत्येक स्त्रियांनी स्वतःला विचारायला हवा आणि आपल्या प्रत्येक सणा मध्ये पर्यावरणाला हीतवाहक कार्य करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.प्रत्येक सांस्कृतिक वारसा जपताना वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगने गरजेचे झाले आहे. प्रत्येक स्त्रीने स्वतःपासून व आपल्या कुटुंबापासून सुरुवात करणे ही काळाची खरी गरज आहे महिलांनी वानांमध्ये रूढी परंपरेला फाटा देत फुलाचे झाड,मास्क,सॅनिटायझर वानांमध्ये वाटप केले तिन वर्षाच्या काळात कोरोना महामारीमध्ये ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने गरजू व्यक्तींना लॉक डाऊन मध्ये मजूर वर्गाचा जो पलायन सुरू होता त्यांना त्या वेळी मजुरांना जेवण्याची नाश्त्याची सोया व गाडीची सोय करून देण्यात आली होती.रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मास्क वितरण करण्यात आले असे अनेक उपक्रम राबविण्यात आले होते.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]