Crime 24 Tass

बी २ वाघाच्या मृत्यूप्रकरणी २४ तासात एका आरोपीस अटक; तीन फरार

भंडारा: – भंडारा वनपरिक्षेत्रातंर्गत डोडमाझरी नियतक्षेत्रामधिल मौजा पलाडी येथील अशोक दसाराम भोंगाडे रा . आंबाडी यांचे शेताच्या बाजुला असलेल्या नाल्यालगत  दि . २८ जानेवारी २०२२ रोजी २५० किलो वजनाचा नर वाघ ( रुद्र बी – टू ) मृतावस्थेत आढळला.  प्रकरणी वन्यजीव प्रेमी संघटनांनी रोष व्यक्त केल्याने भंडारा वनविभागाने आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यांना वनविभागा मार्फत २५ हजाराचे बक्षिस जाहिर करीत नाव गुप्त ठेवण्याचे आश्वासन दिले होते.

दरम्यान बी २ ( रुद्र ) वाघाच्या शिकार प्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी २४ तासाच्या आत दिलीप नारनवरे रा . चांदोरी यास अटक केली आहे . त्याच्या ताब्यातून विद्युत प्रवाहाने वाघाला मारलेले साहित्य जप्त केले आहे . तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत असल्याची माहिती आहे . वाघाच्या मृत्यूची स्थानीक ग्रामस्थांनी वनविभागाला दुपारी २.०० वाजताच्या सुमारास माहिती देताच भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजुरकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व मौका स्थळाची पाहणी केली . मृत वाघ अंदाजे ५ ते ७ वर्ष वयाचा वयस्क नर वाघ असून त्याचे नाकातून रक्त प्रवाह सुरु होता . मृत्युचे कारणांचा शोध घेण्याकरिता पोलीस मुख्यालय भंडारा व नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथील डॉग स्कॉडला प्राचारण करण्यात आले .

तसेच घटानास्थळावर आजुबाजुच्या गावातील ग्रामस्थांनी मृत वाघाला बघण्याकरिता गर्दी केल्याने बंदोबस्तासाठी पोलीस विभागाला बोलविण्यात आले होते . वाघाच्या मृत्युची वैदयकिय तपासणी २ ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अन्नु विजय वरारकर , सहाय्यक आयुक्त पशुसर्वधन , जिल्हा पशुवैदयकिय चिकित्सालय भंडारा व ईतर ४ पशुधन विकास अधिकारी ( श्रेणी -१ ) यांच्या चमूने केली . तपासणीत वाघाचा मृत्यु विदयुत प्रवाहाच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले . वाघाचे सर्व अवयव साबुत होते .

सदर कार्यवाही दरम्यान भंडारा उपवनसंरक्षक एस . बी . भलावी , जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव , कु . पुनम पाटे उपसंचालक नवेगांव नाझरिका व्याघ्र प्रकल्प साकोली , श्री . नाईक अधिक्षक अभियंता एम.एस.ई.डी.सी.एल. , व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी शाहिद खान व श्री . नदिम खान , मानद वन्यजीव रक्षक भंडारा , प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) यांचे प्रतिनिधी वाय . बी . नागुलवार , सहाय्यक वनसंरक्षक भंडारा , रोशन राठोड सहाय्यक वनसंरक्षक साकोली , साकेत शेन्डे , प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगांव आत्राम , सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव साकोली , व्ही . बि . राजुरकर वनपरिक्षेत्राधिकारी भंडारा , संजय मेंढे वनपरिक्षेत्राधिकारी फिरते पथक भंडारा , सचिन नरड वनपरिक्षेत्राधिकारी एस . टी . पी . एफ . कोका , तसेच वनविभागाचे , एस . टी . पी . एफ . चे व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

सदर प्रकरणाचा पुढील तपास एस . बी . भलावी उपवनसंरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात वाय . बी . नागुरवार सहाय्यक वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) भंडारा हे करीत होते . अखेर वनविभागाच्या अधिकान्यांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे . तीन फरार आरोपीच्या शोधात वनविभागाचे पथक कामाला लागले आहेत .

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]