भंडारा न्यूज़
गुराढा शेतशिवारातिल घटना…
शेल्या चारायला गेलेल्या गुराख्यावर बिबटयाचा हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातिल पालांदुर परिसरात गुराढा शेतशिवारातिल घडली आहे।नरेश दयाराम मानकर (40 वय) असे जखमी गुराख्या चे नाव आहे।नरेश नेहमी प्रमाणे आपल्या शेल्या घेऊन गुरढा गावालगत असलेल्या शेतशिवारात चारण्यासाठी घेऊन गेले। होते।दरम्यान दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला। मात्र सोबत असलेल्या गुराख्यानी आरडाओरड करत नरेश मानकर यांच्या पासून बिबट्यापासून हुसकावून लावल्याने नरेश ह्याचे प्राण वाचविले आहे।
गुराखी गंभीर जखमी झाले असून जखमी ला पालांदूर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे।वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनस्थळी भेट देत बिबट्याचा शोध सुरु केला आहे।परिसरात पहाडी व मांगली बांध जंगलक्षेत्र लागून असल्याने वन्य प्राणी शेतकऱ्यांचे पीक उध्वस्त करत होते।मात्र आता झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतावर काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी नागरिकांची मागणी होत आहे।
