▪ ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
▪ लाखांदूर वनविभागाची कारवाई
लाखांदूर :
राञीच्या अंधारात शेतशिवारात नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रानपाखरांची शिकार केल्या जात असल्याची गोपनिय माहिती वन विभागाला देण्यात आली. सदर माहितीवरुन वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचुन केलेल्या कारवाईत रानपाखरांच्या शिकार प्रकरणी सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह १४ जणांना अटक केल्याची घटना घडली. सदर घटना गत ३० जानेवारी रोजी राञी साडे ९ वाजताच्या सुमारास तालुक्यातील रोहणी शेतशिवारात घडली असुन सदर कारवाई स्थानिक लाखांदूर वन विभागा अंतर्गत करण्यात आली आहे.
या कारवाईत स्थानिक वन विभागाने स्थानिक धर्मापुरी टोली येथील रहिवासी आशिष मोरेश्वर शेंडे (२२), खुशाल नत्थु शेंडे (४०), राकेश आनंदराव शेंडे (२४), ज्योतीराव सुखदेव मेश्राम (२५), आशिष सुखदेव मेश्राम (२३), किसन तुकाराम शेंडे (२६), अरविंद सहादेव शेंडे (२५), शरद देविदास शेंडे (३२), दिपक शालिकराम मेश्राम (३०), सेवक सिताराम शेंडे (४६), अमर अशोक शेंडे (२७), गणेश सहादेव शेंडे (३२), प्रदुम्मन मोरेश्वर शेंडे (२२) व अमोल शंकर मेश्राम (२४) आदिंविरोधात वन कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिवाळा ऋतुच्या उत्तरार्धात काही मांसाहारी आंबट शौकीनांकडुन रानपाखरांची मांसाहारासाठी मोठी मागणी दिसुन येते. सदर मागणी नुसार गत काही वर्षापासुन तालुक्यातील काही शिकारी प्रवृत्तीच्या नागरीकंकडुन नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने राञीच्या अंधारात विविध रानपाखरांची शिकार केली जाते. या पाखरांमध्ये लावा, तितिर, कवळी, बटर, हरीयल, तनया यांसह अन्य रानपाखरांचा समावेश आहे.
दरम्यान, घटनेच्या दिवशी राञीच्या सुमारास तालुक्यातील रोहणी शेतशिवारात घटनेतील १४ आरोपी सामुहिकरीत्या नॉयलॉन जाळ्याच्या सहाय्याने रानपाखरांची शिकारी करीत असल्याची गोपनिय माहिती लाखांदूर वनविभागाला देण्यात आली.
सदर माहितीवरुन भंडारा ऊपवनसंरक्षक एस बी भलावी व सहाय्यक वन संरक्षक आर पी राठोड यांच्या मार्गदर्शनात लाखांदूरचे वनपरीक्षेञाधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात क्षेञसहाय्यक आय जी निर्वाण, वनरक्षक एस जी खंडागळे, जि डी हत्ते, एम ए भजे, पी बी ढोले, बी एस पाटील, आर ए मेश्राम, प्रफुल राऊत, वनमजुर विकास भुते आदिंनी रोहणी शेतशिवारात सापळा रचुन घटनेतील १४ शिकाऱ्यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले.
यावेळी आरोपीतांकडुन कवळी पक्षी एकुण ४५ नग पैकी ४२ जिवंत व ३ मृत, मोठी मैना मृत २ नग, लहान मैना मृत १ नग, शिकारीकरीता वापरण्यात आलेले नॉयलॉन जाळ्यासह अन्य साहित्य व ६ मोटार सायकल किमती ३ लाख ६० हजार रुपये व ५ मोबाईल किमती २० हजार असा एकुण ३ लक्ष ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गत कित्येक वर्षापासुन आंबट शौकिन मांसाहारी नागरीकांसाठी रानपाखरांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांविरोधात वन विभागाने केलेली पहिलीच सर्वात मोठी कारवाई असल्याने तालुक्यातील अन्य शिकाऱ्यांचे धाबे दणानले आहेत. तथापी, वन विभागा अंतर्गत शिकाऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचे जनतेत सर्वञ कौतुक केले जात आहे. या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे वनपरीक्षेञाधिकारी रुपेश गावित करीत आहेत.
