Crime 24 Tass

विविध मागण्यांसाठी जय जवान-जय किसान संघटनेचे भंडारा नगर परिषदेवर ‘हल्लाबोल आंदोलन’

नगर पालीका प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडीचे दहन ह मुख्याधिकाNयांना विविध मागण्यांचे निवेदन ह आंदोलनाचा इशारा

भंडारा : शहरातील खराब झालेले रस्ते,नळांना होणारा अशुध्द पाणी पुरवठा यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जय जवान-जय किसान संघटना जिल्हा भंडाराच्या वतीने आज भंडारा नगर परिषदेवर ‘हल्लाबोल आंदोलन’ करण्यात आले.आंदोलनामध्ये मोठया संख्येने संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक सहभागी झाले होते.


दरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या दालनात संघटनेचे पदाधिकाNयांशी झालेल्या चर्चेदरम्यान मुख्याधिकाNयांनी निवेदन स्विकारत मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनानुसार मागील ५ वर्षात भंडारा नगराध्यक्षांनी निवडणुकीमध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न करता जनतेचा विश्वासघात केला आहे.


भंडारा शहरात खात रोड, भैय्याजी नगर, यशोदा नगर, रुक्मिणी नगर, शिवनगरी, सौदागर मोहल्ला, आंबेडकर वार्ड व इतर ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तुटलेल्या नळाच्या पाईप लाईनची दुरुस्ती तात्काळ दुरूस्ती करून नळींना तोट्या लावण्यात यावे, मागील २ वर्षापासून पाईपलाईन करीता खोदलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,
भंडारा शहरातील गोखले बालोद्यान, हुतात्मा स्मारक बगिच्यांचे सौंदर्यीकरण करण्यात यावी, जुनी गांधी विद्यालय, मानवता विद्यालय, भगतसिंग शाळा टाकळी, इंदिरा गांधी शाळा येथे नगर परिषद अंतर्गत बांधकामाचे नुतनीकरण करून सीबीएसई शाळा करण्यात याव्या

भंडारा शहरातील गाळे वाटप संदर्भात घेण्यात येणारी अमानत रक्कम ही ५० हजाराहून कमी करुन ५ हजार करण्यात यावी,

भंडारा शहरातील बसस्टॅन्ड, गांधी चौक, खात रोड व शास्त्री चौक येथे ऑटो रिक्षा साठी जागा निश्चित करुन ऑटो स्टॅन्डसाठी देण्यात यावे, मुस्लीम लायब्रेरी चौकात होणारे अपघात टाळण्याकरीता तिथे स्पीड ब्रेकर तात्काळ बनविण्यात यावे, लाखो रुपये खर्च करून पांढरा हत्ती ठरीत असलेले वाहतुक नियंत्रण दिवे (ट्रॉफीक सिग्नल) तातडीने सुरु करण्यात यावेद्ध, भंडारा शहरात लाखो रुपये खर्च करून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात आले त्याची चौकशी करुन ते अद्यावत करण्यात यावे,भंडारा शहरातील विविध गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी महिला व पुरुषांकरीता शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. भंडारा शहरात डासांचा वाढता प्रादुर्भाव थांब विण्यासाठी फॉगींग व फवारणी नियमित करण्यात यावी, नुतन महाराष्ट्र विद्यालयासमोरील आग्रे ते खोब्रागडे यांच्या घरा बाजुच्या मुख्य नाल्यावर अपघात टाळण्याकरीता तात्काळ स्लॅब टाकण्यात यावे, भंडारा शहरातील झोपडपट्टी कायम करुन त्यांना पट्टे देण्यात यावे,अल्प उत्पन्न धारकांना तातडीने घरकुल उपलब्ध करुन द्यावे,भंडारा शहरातील ज्यांचे घरकुल सर्वे झाले आहेत त्यांना तात्काळ घरकुल मंजुर करुन द्यावे,बी.पी.एल. यादीचे पुर्नः परिक्षण करून नवीन यादी प्रकाशित करण्यात यावी

भंडारा शहरातील नझुल धारकांना पट्टे वाटप करण्यात यावे,

भंडारा शहरातील उत्तर भागात टाकळी परिसरात स्मशान भूमिकरीता जागा उपलब्ध करुन स्मशानभूमिचे बांधकाम करण्यात यावे,भंडारा शहरातील वैनगंगा घाटावरील स्मशान भूमिचे रोड तात्काळ तयार करण्यात यावे,भंडारा शहरातील ठिकठिकाणी घनकचरा घंटा गाडीची व्यवस्था सुरळीत करण्यात यावी,भंडारा शहरातील संपूर्ण स्ट्रीट लाईट तात्काळ सुरु करण्यात यावे, भंडारा नगर परिषदेने ओ.बी.सी. जनगणनेचा ठराव करून आपल्या स्थानिक स्तरावर नगर परिषद तर्फे भंडारा शहरातील ओ.बी.सी. ची जनगणना करण्यात यावी आदि मागण्यांचा समावेश असुन मागण्या पूर्ण न झाल्यास तात्काळ पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


यावेळी जय जवान-जय किसान संघटनेचे संस्थापक प्रशांत पवार, जिल्हाध्यक्ष सचिन घनमारे, जिल्हा संघटक अरूण भेदे , अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसीम (टिंकू) खान,भंडारा शहराध्यक्ष सचिन बागडे , बांधकाम अध्यक्ष नितेश मारवाडे , महिला शहर अध्यक्ष भारती लिमजे ,सुगत शेन्डे, आसीफ पटेल, लोकेश खोब्रागडे, संजय बडवाईक, नाना ठवकर,किशोर पंचभाई,सचिन शहारे, कमलेश बाहे,मोनू रामटेके, अमित दलाल, केजर खान, चंद्रशेखर बनकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]