Crime 24 Tass

शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! ड्रोनद्वारे पिकांवर करणार कीटकनाशक फवारणी

भंडारा: अरे व्वा!भंडाऱ्यातील एका शेतकऱ्याने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. ड्रोनद्वारे (Drone) पिकांवर कीटकनाशक फवारणी केली जाणार आहे. होय! मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने (Farmer) भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला आहे. भंडारा जिल्हाच्या लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे विनायक बुरडे नामक शेतकऱ्याने आपल्या शेतात हा प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन द्वारे फवारणीच्या प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या प्रयोगादरम्यान परिसरातील शेकडो शेतकरी त्यावेळी उपस्थित होते. या प्रयोगणे वेळ, कीटकनाशक, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात धानासोबतच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, जिल्ह्यात रोजगार हमीचे कामे भरपूर सुरु असल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. वेळोवेळी फवारणीच्या कामाला तर कुणीही मजूर येत नव्हता. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशिल शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात केला आहे.


एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य;

यावेळी आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सानप आदि मान्यवर उपस्थित होते. शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ल्ड एरिगेशनच्यावतीने हा प्रयोग यशस्वीरित्या सादर करण्यात आला. यावेळी टमाटर, मिर्ची आणि वांग्याच्या शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली.

विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असून एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येत आहे. 30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लिटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येत आहे. त्यांमुळे अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याची माहिती शेतमालकाने दिली आहे.


“शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा”

या वेळी ड्रोनची मोठी किंमत बघता मजूर टंचाईवर सामना करण्यासाठी शेतकरी किंवा बचतगट ड्रोन खरेदी करणार असली तर त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वसन मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षानी दिली असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजुन मोठा आर्थिक आधार ही मिळाला आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ड्रोन द्वारे कीटनाशक फवारणीसाठी केंद्र सरकार अर्थ सहाय्य करणार असल्याचे स्पष्ठ झाले असताना भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेला प्रयोग वाखण्याजोगे आहे है नक्की म्हणावे लागेल. एकंदरित है तंत्रज्ञान इस्राइल सारख्या प्रगत देशात पहायला मिळत असतांना आता देशात त्यात ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पहायला मिळत असेल तर नक्कीच “मेरा देश बदल रहा है” म्हणन्याची वेळ आली आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]