Crime 24 Tass

ड्राइवरचे लक्ष नसल्याचे बघून अवजड वाहनांची चोरी करणाऱ्या दोन आरोपी तुमसर पोलीसांनी केली अटक चोरीला गेलेला मिनीट्रक जप्त

ड्राइवरचे लक्ष नसल्याचे बघून अवजड वाहनांची चोरी करणाऱ्या दोन आरोपी भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलीसांनी अटक केली असून आरोपी कडून एक चोरीला गेलेला मिनीट्रक जप्त केला आहे।ह्या प्रकरणी योगेश मारोती हटवार (23) व भाऊ देवदत्त मारोती हटवार (28) दोघही रा. नेहरु वार्ड मोहाडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील चालक मोहम्मद ईमरान अब्दुल शकील याने घटनेच्या दिवशी 8 फेब्रुवारी 2022 रोजी मिनीट्रक ( क्रमांक एमएच 40 बीएल 2353) या ट्रकमध्ये केळी भरुन बालाघाट येथील सब्जीमंडी मध्ये सोडून परत पथ्रोट येथे खापा मार्गे जाण्यास निघाला।खापा येथील रिजवी पेट्रोलपंप येथे मिनीट्रक लॉक करुन जेवण करण्याकरीता धाब्यावर गेला। त्या दरम्यान अज्ञात आरोपींनी ट्रक चोरुन नेला।अज्ञात आरोपीविरुध्द ट्रक चालकाने तुमसर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविण्यात आली।घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी योगेश व त्याच्या भाऊ देवदत्त यांना ताब्यात घेऊन चोरीला गेलेला मिनीट्रक जप्त केला। पोलीसांनी दोघाही आरोपी भावांना अटक केली आहे।तुमसर पोलिसांच्या ह्या कारवाईने ट्रक चोरी करणारी मोठी टोळीच्या छडा लागला आहे

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]