नागपूर आणि भंडारा वन विभागाच्या पथकाने केलेल्या संयुक्त कार्यवाहीत बिबट्याचे अव्यव विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून बिबट्याच्या मिशा, नखे आणि दात जप्त करण्यात आलेले आहेत।
नागपूर वन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार पवनी तालुक्यातील सावरला येथे वन्य प्राणी बिबट याच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली। नागपूर वन विभागाच्या टीमने भंडारा वन विभागासह विशेष पथक तयार करून सापळा रचला। आरोपीला या विषय अंदाज लागल्याने त्याने तिथून पळ काढला,मात्र वन विभागाच्या चमूने आरोपी रंगनाथ शंकर माथेरे वय 35 वर्ष रा. तोरगाव ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथून मुद्देमालासह अटक केली आहे।आरोपी कडून बिबट्याच्या मिशा 21 नग, 13 नखे आणि बारा दात यामध्ये चार सुळे दात समाविष्ट आहे।आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या विविध कलमांतर्गत वन गुन्हा नोंदविण्यात आला।पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षण भंडारा हे करीत आहेत।
