भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यानो पिक सांभाळा!! होय भंडारा जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे झाले आहे।हवामान खात्याचा अंदाज नुकताच अवकाळी पावसाचे संकेत दिले आहे।
मध्य भारतात मधील काही भागा मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने पूर्व विदर्भातील काही भागा मध्ये 11 तारखे पर्यत्न अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे।विशेष म्हणजे लाखांदूर, साकोली, तुमसर व लाखनी ह्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ह्याच तालुक्यात शक्यता जास्त आहे।त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावण्याचे चिन्ह दिसू लागले आहे। सध्या शेतात गहू, चना, वाटाणा, या सह कडधाण्य पिक शेतात उभे असल्याने ह्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे।तर दूसरी कड़े धानखरेदी केंद्रामध्ये विक्री करीता आनलेला तसेच खरेदी केलेले धान उघड़या वर पडला असून तोही भिजुन खराब होण्याची शक्यता आहे।त्यांमुळे पुढील दिवस काळजी घेण्याची आवाहन भंडारा जिल्हा आपत्ति विभाग करीत आहे।
