भंडारा जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या असून, त्यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या कोरोना एन्टिजेन चाचणीत तब्बल जिल्हातील 58 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले असल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली असून सर्व पोझिटीव्ह शिक्षकांना विलगीकरणात ठेवन्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या असून शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांनी कोरोना चाचणी करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते। त्यानुसार जिल्ह्यातील 7 हजार 74 शिक्षकांपैकी 5 हजार 81 शिक्षकांनी एन्टिजन चाचणी केली असून त्यापैकी 58 शिक्षक पॉझिटिव्ह आले।विशेष म्हणजे सर्वाधिक पॉझिटिव्ह 20 शिक्षक भंडारा तालुक्यात आहेत। तर मोहाडी तालुक्यात 19, तुमसर 7 लाखनी 5, साकोली 4 लाखांदूरचे 3 शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले।विशेष म्हणजे पवनी तालुक्यातील सर्व शिक्षक तपासणीत निगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्याप 1 हजार 97 शिक्षकांची कोरोना चाचणी शिल्लक असल्याने आकडेवारी वाढन्याची शक्यता वर्तविन्यात येत आहे. दरम्यान या पॉझिटिव्ह शिक्षकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे
