Crime 24 Tass

प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वक्तव्याचा निषेधार्त भंडारा येथे काँग्रेस ची निदर्शने

भंडारा-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा आज भंडारा जिल्हा काँग्रेसतर्पेâ जिल्हाधिकारी चौकात निषेध नोंदविण्यात आला. पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा अपमान केला असा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकत्र्यानी केला. लोकसभा आणि राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधानांनी काँग्रेसने कोरोना पसरविण्यासाठी हातभार लावला असे वक्तव्य केले होते. यानंतर काँग्रेसकडून संपुर्ण राज्यात या वक्तव्याचा निषेध करण्यात आला
संसदेच्या बजेट अधिवेशन मध्ये माननीय पंतप्रधान यांनी दिलेल्या विधानांचा सर्व राजकीय विश्लेषका कडून सामाजिक संघटन आणि राजकीय पार्टी अशा सर्वच स्थरातून निषेध होत आहे. राजकीय विश्लेषकानी तर त्यांचे हे व्यक्तव्य अतिशय निंदनीय असून संसदेतिल मान मर्यादा ओलांडली असे म्हटले आहे


भंडार्‍यात कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नेतृत्वात आज जाहिर निषेध रॅली काढण्यात आली.

आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडल्याने काही काळ महामार्ग विस्कळीत झाला होता यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष आजबले, कलाम शेख,महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर, इंटक चे अध्यक्ष धनराज साठवने, माज़ी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, लाखनी तालुका अध्यक्ष राजू निर्वाण,तुमसर तालुका अध्यक्ष शंकर राउत, साकोली तालुका अध्यक्ष होमराज कापगते, भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, अनुसूचित जाति जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम, क्रीड़ा जिल्हाध्यक्ष राकेश कोडपे,एनएसयुआय जिल्हाध्यक्ष पवन वंजारी आदि उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी कोरोना काळात महाराष्ट्र कांग्रेस ने काय केले आणि महाराष्ट्रतील जनतेने परप्रांतियांसाठी काय केले हे यावेळी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या बिनविचारी हुकुमशाही पद्धतीनुसार अचानक लॉकडाउन घोषित करुण देशातील संपूर्ण जनतेची नाकाबंदी केली त्यावेळेस केवळ परप्रांतीय मजूर प्रत्येक प्रदेशातील जिल्ह्यातील बाहेर शिक्षण घेणारे विद्यार्थीसुद्धा अडकले होते त्यावेळेस काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस व जिल्हा कांग्रेस यांनी परप्रांतीयांना त्यांच्या परत स्वगावी जाण्याकरिता वाहतूक सेवा उपलब्ध करून दिली तसेच ठिकठिकाणी पाणी व जेवनाची सुविधा उपलब्ध केली. देशात अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभरण्यात आले आणि कोरोना रुग्णाची सेवा करण्यात आली ज्यांनी काहीच केले नाही अशा पक्षाचे पंतप्रधानांनी कोरोना कांग्रेसने पसरवल्याचे दुर्भाग्य पूर्ण व्यक्तव्य केले हे अत्यंत निषेधार्थ असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यावेळी म्हणाले यावेळी रास्त रोको करणार्‍या आंदोलकांना पोलीसांनी अटक करीत काही वेळानंतर त्यांची सुटका केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]