Crime 24 Tass

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

भंडारा : ग्रामपंचायतमध्ये डाटा ऑपरेटर असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना पवनी तालुक्यातील नेरला येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

पगमेश्वर रामदास पाल (३१) रा. नेरला असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
पगमेश्वर हे नेरला येथील ग्रामपंचायतमध्ये मागील काही वर्षांपासून डाटा ऑपरेटर म्हणून कार्यरत होते.
दरम्यान,त्यांना मद्यप्राशनाची सवय जडली होती. पगमेश्वर यांनी घरी असलेल्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेतला.
घरच्यांच्या ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी धावाधाव केली आणि गळफास घेतलेल्या अवस्थेतील पगमेश्वरचा मृतदेह खाली उतरला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
मृतक पगमेश्वरला पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी आहे.
आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]