Crime 24 Tass

तीन निलगाय आणि दोन रानडुकरांची शिकार

अड्याळ वनपरिक्षेत्रातील घटना : मांस विकणाऱ्या दोघांना लाखनीत अटक

भंडारा / लाखनी : लघुदाब वाहिनीवरून विद्युत पुरवठा घेत तीन नीलगाय आणि दोन रानडुकरांची शिकार करण्यात आली.

ही घटना अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाडी बीटाअंतर्गत येणाऱ्या खासगी शेतशिवारात उघडकीस आली.

दरम्यान,शिकार केलेल्या निलगायचे मांस विकताना लाखनी वन विभागाने दोघांना अटक केली.

या शिकार प्रकरणाने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर कैलास वाघधरे (२८) आणि विद्याधर तिवाडे (३९) दोन्ही रा.किटाडी (मांगली) असे लाखनी वन विभागाने मांस विक्री करताना दोघांना अटक केली,वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अड्याळ वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या किटाडी बीटातील एका खासगी शेतशिवारात सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत शिकार्‍यांनी लघुदाब वीज वाहिनीवरून अनधिकृतरित्या वीजपुरवठा करून तो लांबविला होता.


शिकाऱ्यांच्या या वीज प्रवाहित जाळ्यात नर प्रजातीचे तीन नीलगाय आणि मादी प्रजातीचे दोन रानडुक्कर अडकले.


विद्युत पुरवठा असल्याने त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


यानंतर शिकार्‍यांनी तीन नीलगाय पैकी दोन निलगाय आणि एका रानडुकराचे मांस विक्रीसाठी कापले दरम्यान,लाखनी वनविभागाला सावरी (मुरमाडी) तेथे काही इसम वन्य प्राण्यांचे मांस विक्री करीत असल्याची माहिती मिळाली,या माहितीवरून लाखनी वनपरिक्षेत्राधिकारी एस.पी.गोखले यांनी आपल्या पथकासह गावात गुप्त पाळत ठेवत चंद्रशेखर वाघधरे याला वन्य प्राण्यांचे मांस विक्री करत असताना रंगेहात पकडले.


त्याने दिलेल्या माहितीवरून वन विभागाने विद्याधर तिवाडे यालाही ताब्यात घेतले दरम्यान,नीलगाय आणि रानडुकराची शिकार झाल्याची माहिती मिळताच,

अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
पशुधन विकास अधिकारी डॉ गुणवंत भडके यांच्या पथकाने शवविच्छेदन केले.

चितळाचे सांगून नीलागायच्या मांसची विक्री
अड्याळ वनपरिक्षेत्रातील किटाळी येथे शिकार झालेल्या तीन नीलगाय पैकीच शिकऱ्यांनी दोन नीलगायचे मांस काढले. हे मांस त्यांनी खवय्यांना विकले.

मात्र,मांस विकताना शिकऱ्यांनी हे मांस निलगायचे असल्याचे न सांगता चितळाचे मांस असल्याची खोटी बतावणी करून ते नागरिकांना विकल्याचीही त्यांनी वनविभागाजवळ कबुली दिली आहे.

शिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्यात वनविभाग अपयशी
दहा दिवसापूर्वी ५ फेब्रुवारीला अड्याळ वनपरिक्षेत्रातील पिंपळगाव (निपाणी) येथे विषबाधेतून एक बिबट,दोन कोल्हे आणि तीन गावठी स्वान मृतावस्थेत आढळले होते.

तत्पूर्वी वर्षभरापूर्वी याच वनपरिक्षेत्रातील कलेवाडा येथे दोन बिबट्यांची शिकार करून त्यांचे अवयव गायब करून दोन्ही बिबट्याला विहिरीत फेकण्यात आले होते.

तर,२७ जानेवारीला भंडारा वन विभागातील मथाडी शेतशिवारात एका वाघाची शिकार करण्यात आली होती. दिवसागणिक शिकारीचे प्रमाण वाढत असले तरी,वन विभाग या शिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे.

अड्याळ वनक्षेत्रात शिकार; लाखनीत अटक
लाखनी तालुक्यातील सावरी (मुरमाडी) येथे विठ्ठल दिघोरे यांच्या संडास बाथरूमजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करीत असल्याची माहिती लाखनी वनविभागाला मिळाली. सापळा रचून वनाधिकार्‍यांनी चंद्रशेखर वाघधरे याला पाच किलो वन्यप्राण्यांच्या मांसासह ताब्यात घेतले.

घड्याळ वनक्षेत्रात शिकार केलेल्या निलगायचे मांस असल्याची कबुली त्यांनी दिली. यात दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक कुलराज सिंग,सहाय्यक वनसंरक्षक आर.पी.राठोड यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी एस. पी. गोखले,क्षेत्र सहाय्यक डी.के.राऊत,बीटरक्षक एम.एल.शहारे,बिटरक्षक के. एस.सानप,बिटरक्षक एस.एस.रंगारी,बीट मदतनीस आर.यु.सय्यद आदींनी केली.


प्रतिक्रिया
विद्युत करंटने वन्यप्राण्यांचा मृत्यू
सदर शिकार ही विद्युत प्रवाहित वीज तारांच्या स्पर्शाने केली आहे. तिन्ही नीलगाय हे नर प्रजातीचे तर दोन्ही रानडुक्कर हे मादी प्रजातीचे आहे. दोन नीलगाय आणि एका डुकराचे मांस काढण्यात आल्याचे आढळून आले. हा शिकारीचा प्रकार आहे.

डॉ गुणवंत भडके,
पशुधन विकास अधिकारी, लाखनी

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]