साकोली राष्ट्रीय महामार्ग वरील घटना
साकोली पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर लगत असलेल्या ऊकारा फाटा येथे सोमवारला अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी हरीण जागीच ठार झाली आहे.राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांना ही घटना लक्षात येताच वनविभागाला माहिती दिली.परंतु सायंकाळी सहा वाजेपर्यंत घटनेची कोणतीही नोंद वन विभागाने घेतलेली नव्हती रोजगार हमीच्या कामावर असणारे चेतन वाघारे, आकाश खोटेले,आदित्य सोनवाने, निलेश वाघारे या प्राणी मित्रांनी घटनास्थळी भेट दिली मात्र मादी हरिण मृतावस्थेत होती.या प्रकरणी प्राणी मित्रांनी वनविभागाला माहिती लक्षात आणून दिली आणि वनविभागाने घटनेची नोंद केली असून अज्ञात वाहनाच्या शोध घेत आहेत.वृत्त लिहेपर्यत अज्ञात वाहनाचा शोध लागलेला नाही..
