Crime 24 Tass

भंडारा गोंदिया जिल्ह्यात आढळले भरपूर प्रमाणात स्थलांतरित बदकांचे थवे

ग्रीनफ्रेंड्स तर्फे लागोपाठ 20 व्या वर्षी स्थलांतरित पक्षीगणना

यावर्षी मोठ्या प्रमाणात कलहंस बदकांचे आगमन

लाखनी:-येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे 2002 पासून स्थलांतरित पाणपक्षी गणना केली जात असून यावर्षी सुद्धा डिसेंम्बर,जानेवारी तसेच फरवरी महिन्यात स्थलांतरित पाणपक्ष्यांचे निरीक्षण साकोली लाखनी भंडारा तालुक्यातील तसेच गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी व सडक अर्जुनी तालुक्यातील 30 पेक्षा जास्त तलावावर पक्षीगणना केली गेली.
ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी यावेळी सांगितले की स्थलांतरित पक्षी हे विशेषतःयुरोप,सैबेरिया,रशिया मंगोलिया,कजाकीस्तान,चीन अफगाणिस्तान,किरगीजस्तान लडाख मार्गे दरवर्षी भारतात येत असतात.
कलहंस बदक हे आकाराने मोठे बदक 2 ते 6 किलो वजनापर्यंत असलेले(ग्रे लॅग गुज)हे यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र आले असून 18 वर्षांपूर्वी मोजक्या प्रमाणात येणारे हे कलहंस बदक आता शेकडोंच्या संख्येने विविध तलावावर मागील पाच सात वर्षांपासून येत आहेत,यामध्ये प्रामुख्याने सोमनाळा, खुर्सीपार बांध,भुगाव तलाव कोका,गुढरी,शिवनी बांध,नवेगाव बांध,सिरेगाव बांध इत्यादी तलावावर दुर्मिळ कलहंस शेकडोच्या थव्याने इतर स्थलांतरित पक्ष्यासोबत आढळले आहेत.


एवढेच नाहीतर साकोली येथील गावतलावात सुद्धा भरवस्तीतीतील तलावात 6 ते 8 कलहंस बदक चारपाच दिवस आढळले.

कलहंस बदकासोबत भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोठी लालसरी बदक(रेड क्रेस्टेड पोचार्ड)लालसरी बदक(कॉमन पोचार्ड),तलवार बदक(पिनटेल),शेंडीबदक(टफ्टेड डक)गढवाल,गारगेनी(भुवई बदक),हळदीकुंकू बदक(स्पॉट बिल्ड डक)चक्रांग बदक(कॉमन टिल)नकटा बदक(कॉम्बडक),चक्रवाक बदक,हे सुद्धा बदक आढळले,याचबरोबर अटला बदक,मोठी अडई,लहान अडई,चांदी बदक या स्थानिक स्थलांतरित बदकांचे सुद्धा अस्तित्व आढळले.
पाणकाठ पक्ष्यांमध्ये स्थलांतरित शेकाट्या व स्थानिक पाणपक्षीमध्ये ग्रे हेरॉन,उघड्या चोचीचा करकोचा,ब्लॅक आयबीस,व्हाइट आयबीस,टिटवी,पाणढोकरी,पाणकावळे,तिरंदाज तसेच विविध प्रजातीचे बगळे,ढोकरी,तुतवार,कमळपक्षी इत्यादी आढळले.
सोबतच वसंत ऋतू सुरू झाल्यावर युरोपातून येणारे स्थलांतरित पळसमैनाचे सुद्धा अस्तित्व दिसणे सुरू झाले आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.
ग्रीनफ्रेंड्स तर्फे वरील नमूद केलेल्या तलावाव्यतिरिक्तरेंगेपारकोहळी,सोमलवाडारेंगेपार,मानेगाव,साकोलीनवतळा,मुरमाडी,झरप,जेवनाळा,पालांदूर,मांगली बांध,रावनवाडी,सौन्दड,चिचटोला कोसमतोंडी,कोकनागड,टेकेपार डोडमाझरी,सिपेवाडा,भिमलकसा,लाखनी,सावरी इत्यादी एकूण 30 तलावावर मागील वीस वर्षाप्रमाणे निरीक्षण करण्यात आले.


थापट्या बदक(शॉवेलर)राजहंस बदक(बारहेडेड गुज),व्हाइट स्टार्क,रंगीत करकोचा(पैंटेंड स्टार्क) इत्यादी पाणपक्षी यावर्षी अद्याप आढळलेले नाहीत.


मासेमारी,तलाव पर्यटन तलावशेजारी स्वयंपाक शिजविण्याची वाढती प्रवृत्ती शिंगाडा तसेच इतर उत्पादन यांचा विपरीत परिणाम स्थलांतरित तसेच स्थानिक पाणपक्ष्याच्या विहार करण्यावर निर्बंध येत आहेत.
असे मागील वीस वर्षांपासून स्थलांतरित व स्थानिक पाणपक्ष्यांचा अभ्यास व निरीक्षण करणारे ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने यांनी सांगितले.
ग्रीनफ्रेंड्सच्या 20 व्या पाणपक्षी गणनेला प्रा.अशोक गायधने,धनंजय कापगते,विवेक बावनकुळे,योगेश वंजारी,कोमल परतेकी,श्रुती गाडेगोने,निसर्गमित्र पंकज भिवगडे,रोशन कोडापे यांनी सहभाग नोंदविला.
याचा अहवाल महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, बी.एन.एच.एस.मुंबई,व इ-बर्ड तसेच मायग्रँट वॉच बंगलोर या संस्थांना मागील वीस वर्षाप्रमाणे पाठविण्यात आला आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]