Crime 24 Tass

१० मार्चनंतर राज्य सरकारमध्ये होणार बदल

खळबळजनक : नाना पटोले यांच्या विधानाने राजकीय भूकंप

भंडारा : राज्यातील सरकारमध्ये 10 मार्चनंतर मोठे फेरबदल होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले,त्यामुळे राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भंडारा येथे काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध पक्षांतील अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे सूचक विधान नाना पटोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी पालकमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली याबाबत नाना पटोले बोलत होते,पटोले म्हणाले,राज्य सरकारमध्ये जे चालले आहे ते बदलण्याची वेळ आली आहे.

हे बदल 10 मार्चनंतर होतील,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले तसेच पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत व मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी बोललो आहे.

सरकारमध्ये जे काही सुरू आहे,त्यात 10 मार्चनंतर सुधारणा करून सरकारमध्ये नवे बदल पाहायला मिळतील,असे खळबळजनक विधान पटोले यांनी केले.

राज्य सरकारमध्ये काँग्रेसचे 12 मंत्री आहेत

या मंत्र्यांच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यासाठी जनता दरबार उभारण्यात येणार आहेत.

भविष्यात काँग्रेसच्या मंत्र्यांच्या लोकांमध्ये राहून लोकांची कामे करण्याच्या पद्धतीत बदल पाहायला मिळेल,असे सांगून पटोले यांनी 10 मार्चनंतर मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पटोले पुन्हा एकदा राजकीय चर्चेत समोर येतात काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार असल्याचे सांगितले होते.

त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. १० मार्चनंतर नाना किंवा काँग्रेस काय करणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]