भंडारा:- बहुउद्देशीय मिटींग हॉल येथे जिल्ह्यात नविनच रुजु झालेले पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी यांच्या खाकीच्या दणक्याने अवैध धंदेवाहिक चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळु तस्करी, जनावर चोरी व इतर सर्व काळया धंद्याना पुर्ण विराम लागल्याचे चिन्ह दिसत आहे. व अशातच जिल्हयात हरविलेल्या मोबाईल बाबद मा. पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी सायबर सेल यांना निर्देशीत केले. सायबर सेल यांनी IMEI नंबर वरुन ट्रेस करुन शोध घेवुन हरविलेले मोबाईल सायबर पोलीसांच्या मदतीने ७१ मोबाईल हस्तगत करुन मुळ धारकास मिळवुन देण्यात आले.
हरविलेले मोबाईल परत येत नाही असे सर्वांना वाटत असते. असा असलेला गैरसमज सायबर पोलीस स्टेशन . भंडारा यांनी उधळुन टाकलेला आहे. हरविलेले सदर मोबाईल हे भंडारा जिल्हया अंतर्गत विवीध पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या ची तक्रार दाखल होती, सदर दाखल तकारी ह्या तांत्रीकदृष्टया मदतीसाठी सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे तांत्रीकदृष्टया मदत करुन मोबाईल ट्रेस करत असते. अशाच हरवलेल्या मोबाईल पैकी ७१ मोबाईल १ प्लस, रियलमी, ओपो, रेडमी, विवो, ईनफिनिक्स, सॅमसंग, टेक्नो अशा विवीध कंपनीचे मोबाईल किंमती ९,०४,०५१ मुळ धारकास आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती यांच्या हस्ते व स्थागुशा भंडारा पो. नि. श्री. चव्हाण, सायबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज श्री. अभिजीत पाटील यांचे उपस्थितीत मूळ मोबाईल धारकास मोबाईल परत देण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सपोनि अभिजीत पाटील, पोलीस अंमलदार श्री. गौतम राऊत, दिनेश आंबेडारे, राजेंद्र कापगते, वैभव चामट, उमेश्वरी नाहोकर, निखील रोडगे व सुमेध रामटेक यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
