■ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन आंदोलनाचा इशारा
भंडारा : तालुक्यातील मांडवी येथील जि- ल्हा परिषद प्राथ शाळेतील शिक्षीका रेखा दलाल यांना निलंबीत करण्याची मागणी गा- वकऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प.भंडारा यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
■ संपुर्ण देशात स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव नितित्त हर घर तिरंगा अशी घोषणा देशाचे प्रधानमंत्री यांनी दिली होती, परंतु भंडारा तालुक्यातील मांडवी येथील शिक्षिका रेखा दलाल या अमृत महोत्सव काळातील १४ व १५ ऑगस्ट रोजी शाळा ‘मध्ये गैरहजर होत्या या संदर्भात शिक्षण विभ गाकडे अनेकदा लेखी तक्रार करण्यात ये- वूनही कुठलीच दखल घेतली नसल्याने अखेर गावकऱ्यांनी माडवी प्राथमिक शाळेला कुलूप ठोकून आपला रोष व्यक्त केला. त्या- वर शिक्षण विभागातर्फे शिक्षिका रेखा दलाल यांचावर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस् थांना देण्यात आले होते. परंतु २० दिवस लोटुनसुद्धा आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. शालेय वेळेत कायम
■मोबाईलमध्ये व्यस्त राहणाऱ्या कामचुकार प्राथमिक शिक्षकाची बदली ( करण्यात आली) मात्र त्यांच्या ऐवजी नवीन शिक्षकाची माडवी शाळांमध्ये नियुक्ती करण्यात आलेली नाही. सदर शिक्षिकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालक व ग्रामस्था “च्या वतीने वेळोवेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी तक्रारी केल्या मात्र शिक्षण विभाग या बेजबाबदार शिक्षिकाला पाठिशी घालत असल्याचा आरोप नागरिकांनी निवेदनात केला आहे. लेखी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांत संतापाची भावना आहे. करीता शिक्षिका दलाल यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा १९ ऑक्टोंबर २०२२पासुन जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा भंडारा तर्फे निवेदनातुन देण्यात आला आहे..
निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकार सार्वे, सुरज निंबार्ते, रामकृष्ण बेदरकर, सहसराम कांबळे (सरपंच), राजकुमार मोरे, गंगाधर मा रबते, व विजय मदनकर यादी उपस्थित होते.
