जागतिक अंध दिनानिमित्त भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा सौ.स्वातीताई हेडाऊ यांनी शासकीय अंध विद्यालय,भंडारा येथे सदिच्छा भेट दिली व तेथील अंध विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच भंडारा तालुका महिला काँग्रेस कमिटी व अनुसचित जाती विभाग भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे विद्यार्थ्यांना भोजनदान व भेट स्वरूपात डीटीएच देण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम म्हणून श्री.आकाश गोखले व मित्र परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याक्षणी विद्यालयाचे प्राचार्य,अधीक्षक तसेच सौ.मंजुषाताई चौहान, प्रज्ञा नंदेश्वर,सौ.वैशालीताई वालदे,सौ. मंजुषा गोखले व तेथील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
