- आता नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार दीडपट पगार आणि महागाई भत्ता..
गोंदिया(17 आक्टो.). नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांना 2011 पासून नक्षलविरोधी मोहिमेसाठी दीडपट पगार दिला जात होता, मात्र एप्रिल 2021 पासून तो जारी न करता मागील माविआच्या सरकारने दीडपट पगार बंद करून त्यांचे मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केला होता.
24 सप्टेंबर 2022 रोजी सत्तेत आली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गोंदिया-भंडारा विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ.परिणय फुके यांनी नक्षलग्रस्त अशा संवेदनशील गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या या गंभीर प्रकरणाची दखल घेत उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गडचिरोली जिल्ह्याच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे दीडपट पगार व महागाई भत्ता देण्याची मागणी केली होती. .
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. डॉ. परिणय फुके यांचे पत्राची दखल घेत नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहानुभूती दाखवत पगारात दीड पटीने वाढ करून महागाई भत्ता देण्याचे आदेश गृहविभागाला देण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश प्राप्त होताच गृह विभागाने 3 ऑक्टोबर 2022 रोजी एनएएक्स 0720प्र क्र-110/विशा 1ब मुंबई हा शासन निर्णय जारी केला, ज्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडपट वाढ करुन महागाई भत्ता लागू केला आहे.
पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ.परिणय फुके यांचे आभार व्यक्त करत पगार व महागाई भत्त्यात दीड पट वाढीचा आदेश मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
