शिंदे समर्थित गटाचा जोरदार विजय…
भंडारा :- भंडारा जिल्ह्याच्या 17 ग्रामपंचायती करिता झालेल्या निवडणुकीचा निकल जाहीर होऊन यातील 11 ग्रामपंचायती वर शिंदे समर्थित आम. भोंडेकर गटाचे सरपंच विजय झाले आहेत. विजय उमेदवारांनी आम. भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांन सह पोहोचले.
जिथे आम. नरेंद्र भोंडेकर यांनी सर्व सरपंचां
ना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे भोजापुर आणि टेकेपार या दोन ग्रामपंचायत वर सरपंच आणि संपूर्ण पॅनलचा विजय झाला आहे. विजय झालेल्या सरपंच उमेदवारांमध्ये राजेदहेगाव स्वाती रत्नदीप हुमणे, खराडी आशा संजय हिवसे, पिपरी देवदास ठवकर, संगम शारदा मेश्राम, केसलवाडा आशु वंजारी, खैरी सलीता जयदेव गंथाडे, टेकेपार प्रियंका दिनेश कुंभलकर, गोसीखुर्द आशिष माटे, भोजापुर सीमा जयेंद्र मेश्राम, खमाटा रुपाली रणजित भेदे, इटगाव सौ कविता सोमनाथ चौधरी यांचा विजय झाला आहे.
सोबतच संपूर्ण 17 ग्रामपंचायत येथून 137 सदस्य उमेदवार लढविण्यात आले होते ज्यातून 80 सदस्य विजय झाले. वरील संपूर्ण विजय उमेदवारांनी आपल्या विजयाचे श्रेय आम. नरेंद्र भोंडेकर, जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, तालुका प्रमुख राजेश सार्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे यांना दिला आहे.
