काँग्रेस आणि शिंदे गटाची समाधानकारक कामगिरी…
भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एकवर समाधानी….
ठाकरे गटाला भोपळा…
भंडारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 19 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून यात महिला राज पहायला मिळाला आहे।तर तब्बल 13 ग्रामपंचायतीत महिला सरपंच म्हणून निवडणूक आले आहे।विशेष म्हणजे पक्षाच्या विचार करता अपक्षांचा बोलवाला पहायला मिळाला असून तब्बल 09 ग्रामपंचायती अपक्षाचा ताब्यात गेली आहे।तर काँग्रेस आणि शिंदे गटाची कामगिरी देखील समाधानकारक असून कांग्रेस ने 05 ग्रामपंचायती तर शिंदे गटाने 03 ग्राम पंचायती वर आपला झेंडा फडकवला आहे।
तर दूसरी कड़े भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक वर ग्रामपंचायतिवर समाधानी राहिले आहे।दरम्यान ठाकरे गटाला भोपळा मिळालेला आहे।एट उल्लेखनीय बाब अशी की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वता भंडारा जिल्हाचे पालकमंत्री असतांना सुद्धा भाजप विशेष कामगिरी करु शकला नाही।तर तिकडे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नानां पटोले यांच्या यांच्या मतदार संघात कमळ फुलले आहे।एकंदरित अपक्षाची ही निवडणूक ठरली असून आता अपक्ष कोणत्या पक्षाला पाठिंबा देतात हे पहाने विशेष महत्वाचे ठरेल
