Crime 24 Tass

शेतकरी, शेतमजूर, मच्छिमार भूकमरीच्या समस्या निवारण करा- श्री मोहन पंचभाई

ओला दुष्काळ जाहीर करा- श्री मोहन पंचभाई

 

आज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना खालील मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले. शेतकरी हा अन्नदाता आहे शेतकरी जगला तर देश जगेल, परंतु परतीच्या पावसाने राज्यातील शेतपिकांचे फार नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी फार हवालदिल झाला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत आहेत

परंतु राज्यसरकार यांचे पंचनामे सुद्धा करायला तयार नाही. शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. तरी १) राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ७५०००/- रुपये मदत तात्काळ देण्यात यावी. २) शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे मजुरांना काम नाही. तरी मजुरासाठी विशेष अनुदान जाहीर करावे, ३) सततच्या अतिवृष्टीमुळे तलावातील मत्स्यबीज व मच्छी वाहून जावून मच्छिमारांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

तरी मच्चीमारांना विशेष मदत देण्यात यावी. (४) मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भुक निर्देशकांत भारताची घसरण झाली असून, जगात १२१ देशांपैकी १०७ व्या क्रमांकावर आपला देश आला आहे. हे अतिशय खेदजनक असून, भारताची हि प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्र शासनाने आखावे. तरी उपरोक्त मागण्या संबधाने तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा भव्य आंदोलन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

यावेळी श्री मोहन पंचभाई अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सौ जयश्री ताई बोरकर अध्यक्ष महिला काँग्रेस, माजी जिल्हाध्यक्ष सागर भाऊ गणवीर, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, धनराज साठवणे, अजय मोहनकर, धनंजय तिरपुडे, शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, शंकर राऊत, रिजवान काझी, दुर्गेश टांगले, डॉ अशोक कापगते, अनिक जमा, किशोर राऊत, मेहमूद खान, नवाब शेख, भगवान नवघरे, अमोल भोयर, सुधाकर गायधने, शिवा भाऊ गायधने, विनीतकुमार देशपांडे, पवन मस्के, शेखर ईश्वरकर, संजय चौधरी, स्वती हेडाऊ, प्रमोद साकुरे, बाबा पाठेकर, सोनू कोटवानी, मंगेश हुमणे, महेंद्र वाहने, जीवन भजनकर, नंदा ताई मोगरे, अनिता भुरे, पूजा हजारे, योगेश गायधाने, पुष्पा ताई साठवणे, सारिका नागदेवे, कुंदा आगासे, आकाश ठवकर, उमेश वकलकर, संजय सोनकुसरे, श्रीकांत येरपुडे, देऊ हजारे, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]