अधिकाऱ्यांवर सदोष हत्येचा गुन्हा नोंदविण्यात यावा.
राष्ट्रीय महामार्ग या सरकारी उपक्रमाने शितलामाता मंदीर ते रेल्वे क्रसींग रोड वरचे जवळपास १ कि.मी चे काम अजूनपर्यंत सुरु केले नाही. भंडारा शहरातील हे सर्वांत महत्वाचे काम होते. परंतू शासकीय अधिकारी यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. आहे. या एक की.मी. च्या रस्तावर आज पर्यंत ९ जणांचा बळी गेला आहे. जय जवान जय किसान संघटना गेल्या एक महिन्यापासून या रस्तावर सिमेंट रोड झाला पाहिजे या साठी आंदोलन करित आहे. परंतु शासनावर त्यांचा काहीही परिणाम होत नाही असे दिसत आहे.
महत्वाची बाब म्हणजे शितला माता मंदीर ते रेल्वे क्रसिंग हा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचाच भाग आहे. जेव्हा सिमेंट रोडचा डिपिआर तयार करण्यात आला तेव्हा या रस्ता सुन्दा डिपिआर चा भाग होता. परंतू अधिकारी आणी लोक प्रतिनिधी यांनी यामध्ये चेन्ज होता. त्यामुळे सदर रस्ता पूर्ण पणे सदोष बनला आहे. या मध्ये कॉन्ट्राक्टर अधिकारी व लोक प्रतिनिधी यांनी बराच भ्रष्ट्राचार केला आहे. टेंडरच्या रकमे मध्ये सर्व रस्ता डिपिआर मध्ये समाविष्ट केल्यावर ही या रस्ताचे बांधकाम झाले नाही. केन्द्रीय मंत्री मा नितीन गडकरी यांनी या मुदयावर आजपर्यंत एकादाही भाष्य केले नाही. रस्ता सुरक्षा बददल त्याने अनेक भाषणे प्रसिध्द झाली आहेत. परंतू त्यांच्याच अधिकारात सदर रस्ता असतांना सुध्दा अजून काहीही कारवाई झाली नाही. हे फार मोठे अश्य आहे.
रस्तांचा डिपिआर बनवितांना अधिकाऱ्यांनी रस्ते सुरक्षाचा विचार करण्याची गरज आहे. त्याबददल त्यांना बंधनसुध्दा टाकण्यात आली आहेत. त्यामुळे जर रस्ते अपघात होत असतील तर अधिकारी जबाबदार आहेत. सदर रस्तावर मृत्यु झाले असल्याने संबंधीत सर्व शासकीय अधिकान्यावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे नोंदविण्यात यावे अशी मागणी जयजवान जय किसान संघटना करित आहे.
पत्रपरिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, समन्वयक विजयकुमार शिंदे जय जवान जय किसान संघटनेचे भंडारा अध्यक्ष सचिन घनमारे, मनिष सोनकुसरे, कमलेश मेंढे, राकेश आग्रे, किशोर पंचभाई, लक्ष्मण कनोजिया, प्रशांत सरोजकर, जगदिश कडव, नंदकिशोर नागोसे, सचिन वागडे, सचिन शहारे, मोनू रामटेके, संजय नागदेवे, संजय मते, सुहास गजभिये, पायल सतदेवे, भारती लिमजे, सुधीर नायक इत्यादी उपस्थित होते..
