पोलिस अधिक्षकाची कारवाई…
वाळू तस्करि करणाऱ्या ट्रेक्टर सह 4 लाख रूपयांच्या मुद्देमाल जप्त…
भंडारा : वाळू तस्करी करण्यासाठी सहाय्यक ठरलेल्या व्हाट्सऐप ग्रुपच्या एडमिन सह 22 सदस्यावर भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पोलिसांनी गुन्हा नोंद केल्याची घटना घडली असून भंडारा पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार शासकीय कामात अड्थड़ा असा हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे।जिल्ह्यात अश्या वाळू तस्करी साठी सहाय्यक व्हाट्सऐप ग्रुप कारवाई ची ही पहिली घटना आहे।
तुमसर उपविभागिय अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे तामसवाडी-डोंगरला घाटावर महसूल व पोलिस कर्मचाऱ्यासह धाड़ टाकली असता तिथे उपस्थित वाळू चोरी करणारा ट्रैक्टर ला पोलिसांनी ताब्यात घेतले।दरम्यान आरोपी ट्रेक्टर मालक श्याम पटले याच्या कड़े असलेल्या मोबाइल तपासला असता मोबाइल वरील व्हाट्सएप ग्रुप वर संबधित धाड़ी महसूल व पोलिस कर्मचाऱ्याचे लोकेशन सांगणारे वॉइस मैसेज आढळून आले।यामुळे व्हाट्सऐप चा हा वापर वाळू चोरी करण्यासाठी सहायक म्हणून होत असून या ग्रुपमुळे महसूल व पोलिस कर्मचाऱ्याच्या वाळू रोखण्याचा कारवाईच्या शासकीय कामात अडथळा होत असल्याचे पोलिसांनी लक्षात घेता वाळू तस्करीसाठी तयार व्हाट्सऐप ग्रुपच्या एडमिन सह 22 सदस्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे।विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान घटना स्थलावर उपस्थित ट्रेक्टर व दोन फोन असा 4 लाख 5 हजार 500 रूपयांच्या मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे।विशेष म्हणजे या व्हाट्सएप ग्रुप वरील सर्व सदस्यना अटक करण्यात येणार असल्याने या सर्व वाळू तस्करांचे दाबे दनानले आहे।
