- कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखविण्यासाठी केला प्रकार….
- भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल…
भंडारा:कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखविण्यासाठी भंडारा न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून पोलीस शिपायाने चक्क रिव्हॉल्व्हर व 35 काडतूस चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड़ आला असून या प्रकरणी भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल होत आरोपी पोलिस शिपायास अटक करण्यात आली आहे।निलेश खडसे राहणार गणेशपुर असे अटक करण्यात आलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे।
आरोपी पोलीस कर्मचारी नीलेश हा जिल्हा व सत्र न्यायालयात मुद्देमाल व हिफाजत कक्षात तैनातीवर होता।घटनेच्या दिवशी आरोपी नीलेश ची ड्यूटी नसताना तो गार्ड रुम बैग घेऊन आला व 5 मिनिट थांबुन शस्त्राची तपासणी करुन बैग सह निघुन गेला।दरम्यान सहायक फौजदार सुनील सायम यांच्या नावाने असलेली 0.38 शासकीय रिव्हॉल्व्हर आणि 9 MM चे 35 काडतूस शनिवारी चोरून घेऊन गेला।दरम्यान,सहायक फौजदार सुनील सायम यांना रिव्हॉल्व्हर आणि काडतूस चोरी गेल्याची लक्षात येताच त्यांनी यांची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना दिली।माहिती समोर आल्याने भंडारा पोलिसात मोठी खळबळ उडाली होती। त्यांनतर पोलिस अधिक्षकासह पोलिस अधिकारी तपासात लागले असता सीसीटीवी फुटेज तपासल्यावर पोलीस नाईक नीलेश यांच्यावर संशय बळाल्यावर त्याला ताब्यात घेत उलट सुलट प्रश्नाच्या भडीमार केल्याने अखेर आपल्यावर असलेल्या कर्जातून आपन हे कृत्य कर्जबाजारीपणातून सावकाराला धाक दाखविण्यासाठी केल्याचे उघड़ झाले आहे।विशेष म्हणजे रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुस त्याने जिल्हा न्यायालयाच्या समोर सिव्हिल लाइन परिसरात ठेवली होती।अखेर पोलि नाइक निलेश खडसे वर भादवी कलम 380 नुसार गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रिव्हॉल्वर व 35 जीवंत काडतूस पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत।विशेष म्हणजे केवळ धाक दाखविन्यासाठी रिव्हॉल्व्हर चोरण्याची मजल पोलिसांची गेल्याने भंडारा जिल्ह्या पोलिस प्रशासनाच्या कार्य क्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे।
