नाट्यगृह बांधकाम करिता पहिला टप्पा १० कोटी चा निधी मंजूर
भंडारा : भंडारा जिल्ह्यातिल कलावंता द्वारे होत असलेली मागणी हि पूर्ण होवून आता या कलावंतांना हक्काचा रंगमंच मिळणार आहे. आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून महाराष्ट्र शासन द्वारे भंडारा येथे भव्य नाट्यगृहा करिता मंजुरी प्रदान करीत १० कोटींचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला आहे. हे नाट्यगृह स्थानीय मुस्लीम लायब्रेरी चौकात असलेल्या भव्य पटांगणात उभारण्यात येणार असून या निर्णयाने जिल्ह्यातील कलावंतांमध्ये आनंद बघायला मिळत आहे.
भंडारा जिल्ह्याला कलावंतांच्या जिल्ह्याची सुद्धा ओळख लाभली
येथील कित्तेक कलावंतांनी आपली ओळख राष्ट्रीय स्तरावर बनविली आहे. झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राची संस्कृतीचा वारसा चालत राहावा म्हणून कलावंतांनी भंडाऱ्यात नाट्यगृह मिळावे अशी मागणी आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या कडे केली होती. या मागणी ला गांभीर्याने घेत आम. भोंडेकर यांनी शासना कडे याची मागणी केली आणि वेळो वेळी पाठपुरावा करीत राहिले. या पाठपुराव्याला आज यश मिळाले असून शासनाच्या वतीने नाट्यगृहाला मंजुरी प्रदान करून या करीत पहिला टप्पा म्हणून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
ज्या मुळे आता या नाट्यगृहाचे बांधकाम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या नाट्यगृहात 700 श्रोत्यांच्या बैठकीची व्यवस्था राहणार असून याची इमारत भव्य दिव्य राहणार आहे. सोबतच लहान मुलां पासून वयोवृद्ध पर्यंत सर्व वाऱ्याच्या कलावंतांना सुविधा मिळणार आहे. इतकेच नाही तर या नाट्यगृहाचे बांधकाम कुठेही थांबू नये म्हणून निधीचा दुसरा टप्पा लवकरच मंजूर करून आणण्याचे आश्वासन ही आम. भोंडेकर यांनी दिले आहे. आम. भोंडेकर यांच्याद्वारे पाठपुरावा केल्याने मंजूर झालेल्या नाट्यगृहा मुळे जिल्ह्यातील कलावंतान मध्ये आनंदाची लाट उसळली असून या कलावंतांनी आम. नरेंद्र भोंडेकर यांचे आभार मानले आहेत.
