निवडणूक चिन्हा संदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी जानेवारीत होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक निशाणीचा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असून याबाबत आज 12 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी घेण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आयोगाने सुनावणीची पहिली तारीख निश्चित करण्यात आली होती.
आज झालेल्या सुनावणीची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणी वेळी कोणताही युक्तीवाद होऊ शकलेला नाही. पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आज पाच ते सात मिनिटांचं कामकाज झालं, असे ते म्हणाले. आम्हाला अपेक्षित होतं की मूळ दस्तावेज जे आम्ही सादर केले आहेत त्याची छाननी, त्यात खरं-खोटं काय या गोष्टींवर टाकला जाईल आणि मग ते त्यांच्यासमोर जाईल. मात्र आता जानेवारीतील पहिल्या आठवड्याची तारीख दिली आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत, असंही अनिल देसाई यावेळी म्हणाले. एकूण 22 लाख जे कागदपत्र दिले आहेत असा प्रश्न विचारला असता प्रतिज्ञापत्र तीन लाख आहेत आणि अन्य प्राथमिक सदस्यांची ती नोंद आहे.
