आरोपीला पोलिसांनी केली अटक
गिरड: पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिल्ली गावातील खेळत असलेल्या तिन अल्पवयीन लहान मुलींवर एका ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या संबंधी आरोप केशव बावसु वानखेडे वय ५५ वर्ष राहणार माकोना सावरी तालुका चिमुर जिल्हा चंद्रपूर यास गिरड पोलिसांनी अटक केली आहे.

सिल्ली येथे एका ५५ वर्षीय नराधमाने तिन अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास सिल्ली गावात एक ७ वर्षीय व दोन ६ वर्षीय अशा तिन अल्पवयीन मुली नेहमी प्रमाणे खेळत असताना गावात टिन पिप्याचे काम करण्यासाठी असलेल्या नराधम केशव बावसु वानखेडे यांने या मुलींना पैसे देऊन त्यांच्या अल्पवयीन होणाचा फायदा घेऊन त्यांना गावातील ओसाड बाथरूममध्ये अंधारात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले यावेळी यातील एका मुलगीने या नराधमा पासून आपली सुटका करीत पळ काढला व तिने हि अकीगत आपल्या आईला सांगितले यावेळी या संबंधी गावातील नागरिकांना माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
असता हा नराधम दोन मुलीवर अत्याचार करतांना आढळून आला यावेळी नागरिकांनी केशव बावसु वानखेडे याला पकडून ठेऊन या संबंधी गिरड पोलीसांना माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार सुनिल दहिभाते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी अटक केली घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती जाणून घेतली आहे.
पोलिसांनी आरोपी विरोधात ३७६ ए.बी.३५४,३५३ ए.३५४ बी,भादवीसह ४,६,८,१० बाल लैंगिक अत्याचार अनवय गुन्हा दाखल केला असून तिन्ही पिडीत मुलींना वैद्यकीय तपासणी पाठविण्यात आले असून या घटनेचा पुढील तपास गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांच्या मार्गदर्शनात साय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे सह पोलीस कर्मचारी करीत आहे.
