Crime 24 Tass

‘दबंग’ फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीला बॉयफ्रेंडकडून बेदम मारहाण; त्याच्या विरोधात तक्रार दाखल

मुंबई : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप होतच असतं. रिलेशनशिपमध्ये काही सेलिब्रिंटींच आयुष्य उजळून जातं तर काहींच मात्र आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. आता अशातच एका प्रसिद्द अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून फ्लोरा सैनी आहे. नुकतच फ्लोराने आपल्या बॉयफ्रेंडसंबधित एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने तिला बेदम मारहाण केली. तिच्या बॉयफ्रेंडने तिला इतकं मारलं की तिचा जबडा तुटला.

रिलेशनशिपच्या सुरुवातींच्या दिवसांबद्दल बोलताना ती म्हणाली की, आमचे सुरुवातीचे दिवस खूप छान होते. सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र हळूहळू त्यांचं खरं रुप समोर येत गेलं. एकदिवशी त्याने मला जबर मारहाण केली. तिचा बॉयफ्रेंड व्यवसायाने प्रोड्यूसर आहे. या मारहाणी दरम्यान तिला तिचा जीव वाचवणंही कठिण झालं होतं. एवढंच नव्हेतर तो तिला धमक्याही द्यायचा असं अभिनेत्रीने सांगितलं.

फ्लोराने मीटूच्या दरम्यानही खुलासा केला होता की, तिचा लिव्हइन पार्टनरने तिला सेक्शुअली अब्यूज केलं होतं. याविषयी बोलताना ती म्हणाली की, त्याला तिला मारुन टाकयचं होतं. एवढंच नव्हे तर त्याने कधी त्याला सोडलंच तर तो तिला तिच्यासोबतच तिच्या फॅमिलीला मारुन टाकेन अशी धमकीही द्यायचा.

फ्लोरा सैनी कडून तक्रार दाखल 

फ्लोराने या घटनेचं वर्णन केलं आणि सांगितलं की, एका रात्री त्याने अभिनेत्रीला इतका मारलं की, तिचा जबडा तुटला. त्याने त्या रात्री तिला संपवणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी फ्लोराला तिच्या आईचे शब्द आठवले की, ‘जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत अडकता तेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत की नाही, कपडे आहेत की नाही, याचा विचार करू नका, तिथून पळून जा.’ फ्लोरानेही तेच केलं आणि थेट तिच्या घरी धाव घेतली. त्यानंतर फ्लोरा तिच्या पालकांसोबत प्रियकराविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी गेली, मात्र पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडच्या विनंतीवरून तक्रार नोंदवण्यास नकार दिला. नंतर कशी तरी फ्लोराने लेखी तक्रार दाखल केली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे देखील तिने सांगितले आहे. आपल्यासोबत घडलेला प्रसंग कोणावरही ओढावू नये अशीही इच्छा तिनं व्यक्त केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]