Crime 24 Tass
Ind vs Aus Women T20

Ind vs Aus Women T20 :हरमनचा ‘तो माईंड ‘गेम’ अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!

Ind vs Aus Women T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (INDvsAUS) झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या महिला संघाने थरारक विजय मिळवला. सुपर ओव्हरपर्यंत (Ind vs Aus Super Over) गेलेल्या सामन्यात भारताने 4 धावांनी विजय मिळवला.

भारताकडून ऋचा घोष (Richa Ghosh) आणि स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 21 धांवांचं आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ 16 धावा करू शकला. भारताचा विजय झाला पण कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (Captain Harmanpreet Kaur) एक माईंड गेमने सामना पलटला.

नेमकं काय झालं?

सुपर ओव्हरमध्ये भारताच्या 21 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीला ऍशले गार्डनर आणि अलिसा हिली आल्या होत्या. भारताकडून रेणूका ठाकूर गोलंदाजी करत होती. अलिसा हिलीने पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवेळी गार्डनर स्ट्राईकला आली त्यावेळी हरमनने एक चाल केली.

अलिसा हिलीने पहिला चौकार ज्या ठिकाणी मारला तिथे राधा यादव या खेळाडूला ठेवलं, ठरल्याप्रमाणे रेणूकानेही गार्डनरला आखूड बॉल टाकला, तो चेंडू गार्डनरने राधा यादवच्या दिशेने टोलावला. हवेत मारलेला हा चेंडू थेट राधाच्या हातात जावून स्थिरावला, राधानेही उत्कृष्ट फिल्डिंग करत संघाला यश मिळवून दिलं.

जर हा सिक्स गेला असता तर कदाचित सामन्याचा निकालही वेगळा लागू शकला असता. तसं पाहायला गेलं तर भारताने सामना 4 धावांनी जिंकला होता त्यामुळे हा सिक्स झाला असता तर भारताला मोठं नुकसान सोसावं लागलं असतं. त्यामुळे विजयामध्ये हरमनचाही मोलाचा वाटा आहे.

दरम्यान, या सामन्यामध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून भारताच्या स्मृती मानधनाला हा किताब देऊन गौरवण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरला होणार आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]