24 तासानंतर कारवाई संदर्भात महसूल आणि आरटीओला दिली नाही माहिती
भंडारा : 24 तासापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या विशेष पथकाने कोरंबी मार्गावर सुरू असलेल्या मुरूम खाणीवर छापा घातला यात तीन टिप्पर आणि एक जेसीबी जप्त केल्याचे भंडारा पोलिसात दाखल असलेल्या एफ फायर मध्ये नोंद आहे. हे सर्व वाहन कारवाईनंतर पोलीस मुख्यालयतील परिसरात लावल्याची माहिती पोलिसांकडूनच मिळाली मात्र प्रत्यक्ष वाहन असलेल्या स्थळी तीन टिप्पर असून जेसीबी गायब असल्याचे आढळून आले, यावरून पोलीस मुख्यालयातून पोलिसांनी कारवाई केलेली जेसीबी चोरीला तर गेले नाही ना असा संशय आता व्यक्त होत आहे.
सोमवारच्या रात्रीला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली होती यात भंडारा शहरालगत असलेल्या एका मोठ्या गावात तील सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या एका राजकीय पुढार्याची ही खान असल्याची माहिती समोर आली, या पुढार्याने नुकतीच सरकारमध्ये सहभागी असलेल्या एका पक्षात त प्रवेश केलेला आहे हे विशेष या छापा मार कारवाईत पोलिसांनी तीन टिप्पर आणि एक जेसीबी घटनास्थळावरून जप्त केले, त्यानंतर पुढील कारवाई करण्यासाठी सदर प्रकरण भंडारा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. भंडारा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून साहित्यही जप्त आहेत, याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या घटनेची माहिती मागितली असतानाही त्यांनी माहिती न देता टाळ करण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे या कारवाईत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची ही चर्चा आता भूमाफियांमध्ये सुरू झालेली आहे, वास्तविकेत पोलिसांनी केवळ तीन टिप्पर जप्त केले, असून जेसीबी घटनास्थळावरून पसार झाला मात्र त्याला अद्याप ताब्यात घेतलेले नाही असे असतानाही भंडारा पोलिसांनी मात्र जेसीबी ताब्यात असल्याचे छातीठोकपणे सांगितले आहे, या संदर्भात कथित राजकीय पुढार्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे टिप्पर या कारवाईत अडकल्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यातूनच मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची कुज-बुज आता सुरू झालेली आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्याशी प्रत्यक्ष माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.मात्र माहिती मिळू शकली नाही, त्यामुळे खरोखरच या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला तर नाही ना अशी शंका नाकारता येत नाही
