Crime 24 Tass
धारदार शस्त्राने वार

Nagpur Crime : नागपूरच्या शांतीनगरात थरार; धारदार शस्त्राने वार करून इलेक्ट्रिशियनचा खून

Nagpur Crime नागपूर : शांतीनगर येथे अनैतिक संबंधातून इलेक्ट्रिशियन सुदर्शन कावळे (५०, बिनाकी ले-आउट) याची हत्या करण्यात आली. शांतीनगर पोलिसांनी हे गूढ उकलून दोन तरुणांना अटक केली आहे. शुभम (२४) आणि सचिन उर्फ भुऱ्या मदन पटले (२०, शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

सुदर्शन हा आरोपी शुभमच्या घरी राहत होता. तो अविवाहित होता. मंगळवारी रात्री म्हाडा कॉलनीजवळ त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर, पोलिसांनी चौकशीची सूत्रे हलविली. सुदर्शनचा शुभमच्या कुटुंबीयांशी वाद झाल्याची माहिती कळाली.पोलिसांनी शुभमची चौकशी केल्यावर सत्य समोर आले. सुदर्शन १५ वर्षांपासून शुभमच्या घरी राहत होता. त्याची शुभमच्या आईवर वाईट नजर होती.

त्याने त्याच्या आईशी अनैतिक संबंध ठेवल्याची चर्चा होती.ही गोष्ट कुटुंबीयांना कळल्यावर, त्यांनी सुदर्शनला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ऐकले नाही.अखेर संतापलेल्या शुभमने सुदर्शनला दम देण्याचे ठरविले. त्याने त्याचा मित्र भुऱ्याच्या मदतीने त्याला म्हाडा कॉलनीजवळ गाठले व त्याला मारहाण करायला सुरुवात केली.सुदर्शननेही जोरदार प्रतिकार केला. अखेर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली.

हत्येअगोदरही समजावले

शुभमने सुदर्शनला अगोदर असा प्रकार करू नको, असे बजावले. मात्र, सुदर्शननेही त्याचे न ऐकता प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केले.तो ऐकतच नसल्याचे पाहून अखेर दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. भुऱ्यावर अगोदरही जुगार खेळण्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]