Crime 24 Tass
Tunisha Sharma Suicide Case

Tunisha Sharma Suicide Case: ‘शीजानचे अनेक महिलांसोबत रिलेशन, तो फक्त…’, तुनिषाच्या मैत्रिणीचा खळबळजनक दावा!

Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि सहकलाकार शीजान खान याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाच्या आईनं शीजान विरोधात धक्कादायक आरोप केले आहेत.

शीजान यानं तुनिषाला लग्नाचं वचन दिलं होतं आणि तरीही त्यानं तिच्यासोबत ब्रेकअप केलं. तुनिषाचा त्यानं गैरफायदा घेतला. यामुळेच आपल्या मुलीनं आत्महत्या केली असून शीजान याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तुनिषाच्या आईनं केली आहे. यातच आता तुनिषाच्या मैत्रिणीनंही खळबळजनक खुलासा केला आहे.तुनिषा शर्मा हिला शीजान खान यानं फसवलं होतं. यामुळे तुनिषा खूप अडचणीत होती आणि तिला पॅनिक अटॅकही आला होता. याचा खुलासा तुनिषाच्या काकांनी केला होता. आता तुनिषाची मैत्री राया लबीब हिनं सांगितलं की, शीजान याचे अनेक मुलींसोबत संबंध राहिले आहेत. तो एकाच वेळी अनेक मुलींना डेट करत होता.

राया लबीब हिच्या दाव्यानुसार शीजान अनेक मुलींना एकाच वेळी डेट करत होता. तसंच त्याचे एकाचवेळी ६ ते १० महिलांसोबत शारीरिक संबंध देखील राहिले आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला शीजाननं डेट केलेल्या एका मुलीनंच सांगितल्याचं राया हिनं म्हटलं आहे. संबंधित मुलीसोबत शीजान खान रिलेशनशीपमध्ये होता आणि चारच महिन्यांपूर्वी त्यानं तुनिषाच्या भेटीनंतर ब्रेकअप केलं होतं. ती मुलगी सध्या डिप्रेशनमध्ये आहे आणि वैद्यकीय उपचार घेत आहे. तिला या गोष्टीची कुठेही वाच्यता करायची नाही म्हणून ती समोर येण्यास तयार नाही, असंही राया लबीब हिनं सांगितलं आहे.

राया लबीब हिनं केला मोठा खुलासा

“शीजान यानं केवळ शारिरीक सुखासाठी अनेक महिलांचा गैरवापर केला. प्रेम आणि लग्नाचं खोटं आश्वासन द्यायचं. मग मुलींचा गैरवापर करायचा आणि दुसरी मुलगी जाळ्यात फसली की आधीच्या मुलीसोबत ब्रेकअप करायचं. असा शीजान याचा धंदा सुरू होता. शीजान हँडसम आणि मुलींना भुलवण्यात सराईत असल्यानं मुलीही जाळ्यात ओढल्या जायच्या. पण शीजान फक्त सेक्ससाठी मुलींसोबत राहायचा. प्रेम आणि लग्न यात त्याला कोणताही रस नव्हता. तुनिषासोबतही त्यानं हेच केलं आणि ब्रेकअप केलं”, असं राया लबीब हिनं सांगितलं आहे.

“तुनिषा हिला नुकतंच शीजानचं खरं रुप कळलं होतं. ती शीजानवर खूप प्रेम करत होती आणि तिला लग्नही करायचं होतं. तिनं शीजानलाही याबाबत सांगितलं होतं. पण शीजाननं आपण आधीच तुनिषासोबत ब्रेकअप केल्याचं म्हटलं. यामुळेच तुनिषानं आत्महत्या केली”, असा दावा राया लबीब हिनं केला आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]