राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर डोंगरगाव परिसरातील युवक – युवतींसाठी मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 28 डिसेंबर रोजी डोंगरगाव येथे करण्यात आले होते. परिसरातील जवळपास 250 युवक युवतींनी या शिबिराचा लाभ घेतला.
तीन वर्षानंतर पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाल्याने उमेदवारांमध्ये उत्साह आहे. कागदपत्रांची जमवाजमव, लेखी परीक्षेची तयारी, शारीरिक चाचणीची पूर्व कल्पना असावी व त्यासाठी कोणती तयारी केली पाहिजे या सर्वांबद्दल उमेदवारांमध्ये संभ्रम राहू नये व त्यांना याची माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन डोंगरगाव येथील काही सक्रिय इच्छुक तरुणांनी केलं होतं.
भंडारा जिल्ह्याचे माननीय पोलिस अधिक्षक लोहित मतानी सर व आंधळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार सर यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये पोलिस भरती मध्ये अर्ज केल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची छाननी कशी होते, शारीरिक चाचणीमध्ये कोणते प्रकार आहेत, त्यासाठी कसे गुण दिले जाते तसेच उमेदवारांची वजन, उंची मोजली जाईल, शारीरिक चाचणीत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी कोणकोणते व्यायाम केले पाहिजे, आहार काय असला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्याचे माननीय पोलिस अधिक्षक लोहित मतानी , आंधळगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे , मेहेर गुरुजी, बंटी मिश्रा, कमलेश गभने, अनिल आंबिलडुके व इतर पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राहुल कोठेकर व आभार प्रदर्शन महेंद्र गभने यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल कुंभलकर, राहुल सेलोकर, आशय इलमे, नवनाथ डोरले, महेंद्र गभने, दामोधर समरीत, राम पंचभाई, अंकीत गभणे, आश्विन सातपुते, स्वप्नील समरीत, प्रियांशू समरीत, अविनाश आंबिलडुके, साजन सेलोकर, सौरभ सेलोकर, चेतन कुंभलकर, गौरव रुद्रकार, विशाल नान्हे, शुभम कुलरकर, प्रतिक सेलोकर, रोहित कुंभलकर, आशिष गडपायले, चेतन गाढवे, सागर गाढवे, पप्पू ईटनकर, क्रिश्ना मानकर, दिनेश लांजेवार, सुजल कुंभलकर, स्विटी कुलरकर, शालिनी रुद्रकार, स्नेहल कुलरकर, संजना मांढरे, मेघा गाढवे यांनी प्रयत्न केले.
