नवीन वर्षात मकरसंक्रातीचा सन असल्याने जिल्हयात मोठया प्रमाणात उत्साहात सन साजरा करण्यात येतो. मकरसंक्रातीत पतंग उडवून सन साजरा करण्यात येतो परंतु काही लोकांकडून शासनाव्दारे प्रतिबंधीत मांजा चा वापर करुन पंतग उडविल्या जातात. त्यामुळे पशु, पक्षी यांचे जिवीतास धोका निर्माण होते. तसेच पर्यावरणाचे नुकसान होत असते. तसेच नाईलॉन मांजा अडकुन वाहनचालकाचे गळा कापल्याजाने व नाईलॉन मांजा अडकून वाहणाचे अपघात होवून जिवीतहाणी होण्याचे प्रकार घडतात.
या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी लोहीत मतानी पोलीस अधीक्षक भंडारा, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक. भंडारा व संजय पाटील. उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा यांचे मार्गदर्शनात सुभाष बारसे ठाणेदार पोलीस स्टेशन भंडारा यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन भंडारा येथील डी.बी. पथकाचे पोउपनि कराडे, पोहवा वरकडे, पोना कुकडे,पोना राठोड, पोशि झलके, पोशि लांडगे,मोहवा शेंडे यांनी शासनाव्दारे प्रतिबंधीत नाईलान मांजा विक्री करीत असल्याचे माहिती मिळाल्याने गोपनीय माहितीवरुन भंडारा शहरातील वल्लभाई पटेल पुरा वार्ड योगेशकुमार राजकुमार पशीने यांच्या दुकाणात रेड केली असता त्यांचे दुकाणातून किमती 18850/- रु प्रतिबंधीत नाईलॉन मांजा जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी मकरसंक्रात साजरी करतांना पतंग उडवितांना नाईलान मांजा चा वापर करु नये प्रतीबंधीत नाईलान मांजा ची विक्री केल्यास किंवा पतंग उडवितांना नाईलान मांजा चा वापर केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आव्हाहन पोलीस निरीक्षक सुभाष बारसे ठाणेदार पोलीस स्टेशन भंडारा यांनी नागरीकांना केले आहे.
