Crime 24 Tass
crime_24_tass

Bhandara Crime : भंडाऱ्यात दारूच्या नशेत भाच्याने केली मामाची हत्या, दोघेही विट भट्टीवर होते कामाला

Bhandara Crime News : दारूच्या नशेत भाच्याने मामाची हत्या केल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्यातील कारधा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या अजीमाबाद येथे घडली. राजू मनहारे (वय 33) असे मृतकाचे नाव आहे. तर, सुनीलकुमार छत्तु गितलहरे (वय 18) असे आरोपी भाच्याचे नाव असून दोघेही मुळ रा. सलोनी, जिल्हा बलोदाबाजार राज्य छत्तिसगढ येथील रहिवासी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील अजिमाबाद गावाच्या शेतशिवारात विटभट्टीचा उद्योग सुरू आहे. या विटभट्टीच्या कामासाठी विटभट्टी मालकाने छत्तीसगड राज्यातील कामगार कामावर आणले होते. त्यात या मामा-भाच्याचा समावेश होता. हे दोघेही भट्टी परिसरात अन्य कामगारांसह एका झोपडीत राहत होते.दारु पिल्यानंतर झाला दोघांमध्येही वाद
रविवारी त्यांनी भट्टी मालकाकडून आठवड्याचा आर्थिक मोबदला घेऊन रात्रीच्या जेवणासाठी मासोळी विकत घेतली. त्यानंतर दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत मामा भाच्यात वाद झाला. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने भाच्याने मामाला जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्र्विती राव, कारधा ठाणेदार राजेशकुमार थोरात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे, सहायक पोलिस निरीक्षक ऋषिकेश चाबुकस्वार हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाच्याला अटक केली आहे.

मातीच्या खड्ड्यात मृतदेह आढळला
दारु प्यायलानंतर दोघांमध्येही वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे भाच्याने मामावर हल्ला केला. त्यानंतर मामाला मारण्यासाठी भाचा मागे धावला. यामध्ये मामा रात्रीच्या अंधारात विटांसाठी बनवलेल्या मातीच्या खड्ड्यात मामा पडला आणि त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा संशय उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु
मामा आणि भाचे दोघेही याठिकाणी तयार करण्यात आलेल्या मातीच्या झोपडीमध्ये सोबतच राहत होते. तसेच त्यांचे परिवार हे छत्तीसगडमधील बलोदाबाजार जिल्ह्यात राहतात. तसेच सुट्टी मिळेल तसे दोघेही आपल्या गावीही जात होते. मात्र कोणत्या कारणामुळे दोघांमध्येही वाद झाला? तसेच हा अपघात आहे की खून? याचा सखोल तपास करण्याच्या दिशेने पोलिसांकडून तपास सुरु असून लवकरच याचा तपास सुरू आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]