Crime 24 Tass

2 हजार विद्यार्थिनींनी बघितली परीक्षा पे चर्चा

LED वॉल, स्मार्ट टीव्ही वर थेट प्रक्षेपण

भंडारा. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा विषयीचे दडपण कमी करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून जगभरातील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे स्थानिक नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थिनींना थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून शालेय जीवनातील अनेक विषयाला घेऊन विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यन्त पोहोचविण्यासाठी नूतन कन्या शाळेच्या प्राचार्य निलू तिडके यांनी शाळेच्या पटांगणात भव्य LED वॉल उभारली.

3 वर्गखोल्यांमध्ये असलेले स्मार्ट टीव्ही व LED च्या माध्यमातून वर्ग 5 ते 12 च्या तब्बल 2 हजार पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले गेले. एनआयसी च्या चॅनल वरुन हे प्रक्षेपण थेट विद्यार्थिनींना व शिक्षकांना लाभदायी ठरले. या प्रसंगी शासनाच्या प्रतिनिधी म्हणून माजी नगर सेविका मधुरा मदनकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य नीलू तिडके यांनी विद्यार्थिनींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चर्चेचे मुद्दे समजावून सांगितले व मार्गदर्शन केले.
नूतन कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहरराव बोंगिरवार, सचिव एम. एल. भुरे, सहसचिव शेखर बोरसे, सदस्य रेखा पनके, प्रमोद पनके यांनी या उपक्रमाबद्दल प्राचार्य व सहायक शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेनीलाल चौधरी, अश्विनी महाकाळकर, प्रांजल मालगावे, प्रज्ञा निनावे यांनी सहकार्य केले.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]