दहावीच्या इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी वडीलांचा मृत्यु.
★ सोनी/संगम गावातील प्राचीचा धाडसी निर्णय.
लाखांदुर :-ऐन इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी वडीलांचा मृत्युची बातमी लागल्यानंतर, संपुर्ण कुटुंब व गावात शोकाकुल वातारण असतांना, वडीलांचा अंत्यविधी सोडून मुलीने दहावीचा पेपर देण्याची तयारी दर्शवून. काळजावर दगड ठेवत सअश्रू नयनांनी तिने वडीलांची स्वप्नपुर्ती आणि अश्रुची फुले करण्यासाठी दहावीचा इंग्रजीचा पेपर पेपर सोमवारला (ता.०६) लिहिला आहे. प्राची राधेश्याम सोंदरकर रा. सोनी असे विद्यार्थीनीचे नाव आहे.
लाखांदुर तालुक्यातील सोनी/संगम येथील रहीवासी असलेले राधेशाम सोंदरकर यांचा गत महिण्यात महाशिवरात्रीच्या दिवशी दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी लाखांदुरवरून स्वगावी सोनीकडे जात असतांना मेंढा फाट्याजवळ अज्ञात चार चाकी वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुर मेडीकल मध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातजनक राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे.
दरम्यान वडील राधेशाम यांच्यावर नागपुरात उपचार सुरू असतांना तोंडावर दहावीची परीक्षा होती. घरातील कर्त्या पुरूषाचे अपघात झाल्याने घरात शोकाकूल वातावरण निर्माण झाले होते. माञ मुलीने या संकटकाळात खचून न जाता, वडीलांनी मुलींनाच मुलासमान जपत ‘‘पोरी, अभ्यास कर, उच्च शिक्षण घेऊन पुढे जा, खुप मोठी हो, स्वत:च्या पायावर उभी हो.’’ हा वडीलांनी सांगितलेला कानमंञ लक्षात ठेवत दहावीच्या परीक्षेची तयारी अविरत चालू ठेवली. गुरूवारला (ता. ०२) दहावीचा पहिला मराठीचा पेपर झाल्यानंतर पाच दिवसानंतर असलेल्या दुसऱ्या इंग्रजीच्या पेपरची तयार केल्यानंतर राञी उशिरापर्यत व पहाटे लवकर उठून अभ्यास करत असतांना.
अशातच सकाळी 6 वाजता सुमारास मोबाईल फोन खनखनला परीक्षार्थी मुलीने फोन हातात घेऊन उचलला आणि वडीलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच मुलगी निशब्द झाली. वडीलांच्या मृत्यूची बातमी मोहल्ल्यात वाऱ्यासारखी पसरली, शेजारी एकवटले, बघता – बघत घरासमोर गर्दी झाली, शोकाकूल वातावरणात आई, आजी, काका, काकु, लहान बहीण रडायला लागले. माञ प्राचीने वडीलांच्या मृत्यूचे दु:ख लपवून ठेवत न रडता आपले ध्येय गाठयचा प्रण करत, तयारी करून आदर्श इंग्लिश हायस्कुल देसाईगंज वडसा येथील १९३९ हे परीक्षा केंद्र गाठले.
प्राचीच्या हायस्कुलचे मुख्याध्यापक प्रा.दामोधर सिंगाडे ह्यांना घडनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडविण्यासाठी धीर देऊन, वडीलांची स्वप्नपुर्ती करण्यास सांगितल्याने, प्राचीने देखील घरी वडीलांचा अंत्यविधी असतांना तिने धैर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे. प्राचीच्या या धाडसी निर्णयामुळे सर्वञ कौतुक केले जात आहे.
