Crime 24 Tass

नीलगाय शिकार प्रकरणी आणखी पाच जणांना अटक

आरोपींची संख्या झाली १४ : सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भंडारा : विद्युत पुरवठा करून नीलगाय आणि रानडुकराची शिकार करण्यात आली होती. याप्रकरणी यापूर्वी नऊ जणांना वन विभागाने अटक केली होती. या आरोपींच्या संख्येत आणखी वाढ झाली असून वन विभागाने पाच जणांना अटक केली आहे.

त्यामुळे आता नीलगाय आणि रानडुकराच्या शिकार प्रकरणी आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
भास्कर सिताराम दिघोरे, किसन मदन दिघोरे, सेवकराम प्रल्हाद खेडेकर सर्व रा.किटाळी,आकाश संजय चाचेरे,कैलाश धर्मा नान्हे दोन्ही रा.अड्याळ असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.

१४ फेब्रुवारीला वनपरिक्षेत्रातील किटाळी नियत क्षेत्रात विद्युत करंटने नीलगाय आणि रानडुकराची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. दरम्यान,लाखनी वनपरिक्षेत्रातील एका गावात वन्य प्राण्याचे मांस विक्री करताना एका आरोपीला अटक केली होती.

त्यावरून हे प्रकरण समोर आले.
चौकशी दरम्यान,लाखनी वनविभागाने याप्रकरणात सहा तर,अड्याळ वनविभागाने तिघांना अटक केली होती. यात आणखी पाच आरोपींची वाढ झाली आहे. या पाचही जणांना अड्याळ वन विभागाने लाखनी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

घटनेचा अधिक तपास उपवनसंरक्षक कुलराज सिंग,सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार यांच्या मार्गदर्शनात अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी घनश्याम ठोंबरे,वनपरिक्षेत्राधिकारी (फिरते पथक) संजय मेंढे,क्षेत्र सहाय्यक हमीद शेख,क्षेत्र सहाय्यक पंचभाई,वनरक्षक सुधीर कुंभरे,अर्चना बडोले,त्रिवेणी गायधने,नितीन पारधे,एस.ए.गायकवाड, विजय राऊत आदी करीत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]