Crime 24 Tass

शासकीय कार्यालयाला सुट्टीची संधीसाधून चोरांनी चक्क आरटीओ कार्यालयाच्या परिसरातूनच केला ट्रॅक्टरट्रॉली चोरण्याचा प्रयत्न

भंडारा : महाशिवरात्रीनिमित्त शासकीय कार्यालयाला सुट्टी असल्याची संधीसाधून चोरांनी चक्क आरटीओ कार्यालयाच्या परिसरातूनच ट्रॅक्टरट्रॉली चोरण्याचा प्रयत्न केला.ही घटना आज मंगळवारला दिवसाढवळ्या दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.
दरम्यान,एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार चोरांपैकी एकाला परिसरातील नागरिकांनी पकडून भंडारा पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत भंडारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय आहे.
मंगळवारी महाशिवरात्र असल्याने शासकीय कार्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे परिसरातही गजबज नव्हती.
याची संधीसाधून आरटीओ कार्यालयात असलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची पाहणी करून गेलेल्या चौघे एमएच ३६ एजी ४७१३ या वाहनाने आरटीओ कार्यालय परिसरात पोहोचले.
त्यांनी परिसरातील अन्सारी यांची एमएच ४० पी २४३८ या क्रमांकाच्या क्रेन मालकाला भूलथापा देत आरटीओ कार्यालयातील ट्रॅक्टरट्रॉली काढण्यासाठी नेली.


क्रेनच्या मदतीने एमएच ३६ एल ५०९०, एमएच ३६ जी २७५८ क्रमांकाची ट्रॅक्टरट्रॉली बाहेर काढण्यात येत होती.
दरम्यान,क्रेनचालक बेमलास यादव याला सदर इसमांवर संशय आला.यामुळे त्यांनी संशयित एका इसमाचा त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढला.
यासोबतच ज्या चारचाकी वाहनाने चार व्यक्ती ट्रॉलीसाठी तिथे पोहचले,त्या गाडीचा ही फोटो बेमलास यादव याने त्याच्या मोबाईलमध्ये काढला.
ट्रॅक्टरट्रॉली काढत असताना बेमलासला चौघांवरही संशय आला यावेळी,यादव याने चौघांनाही ट्रॅक्टर ट्रालीचे कागदपत्र मागितले,त्‍यामुळे भंबेरी उडालेल्या चौघांनीही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.


यामुळे बेमलास यादव व तिथे उपस्थित अन्य काही व्यक्तींनी चौघांचाही पाठलाग केला.
यावेळी अन्य तीन व्यक्ती चारचाकी वाहनात बसून पळून जाण्यात यशस्वी झाले. तर, एक व्यक्ती नागरिकांच्या हाती लागला.
या व्यक्तीला चोप देत नागरिकांनी भंडारा पोलिसांना पाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.


याप्रकरणी वृत्तलिहीपर्यंत भंडारा पोलिसात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून तक्रार दाखल झालेली नव्हती.त्यामुळे कुणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

बिना कुलूपाचे प्रवेशद्वार
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात या परिसराला एक लोखंडी प्रवेशद्वार लावलेले आहे. मात्र, या प्रवेशद्वारावर येथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामूळे कधीच कुलूप लावल्या जात नाही. याच संधीचा लाभ घेत या चोरट्यांनी दिवसाढवळ्या ट्रॅक्टरट्रॉली चोरून नेण्याचा प्रयत्न केला.

तक्रारीनंतरच गुन्हा दाखल करून पुढील कारवाई
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार दाखल केल्यानंतरच गुन्हा दाखल करू. संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. तक्रारीनंतरच आरोपींची नावे पुढे येईल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

  • सुभाष बारसे,
    पोलीस निरीक्षक, भंडारा
crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]