Crime 24 Tass

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जिल्ह्यात

भंडारा बायपासचा शिलान्यास व खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

भंडारा: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे 3 मार्च रोजी भंडारा जिल्ह्यात येते त्यांच्या हस्ते भंडारा बायपास मार्गाचे भूमिपूजन व खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे.
भंडार्‍यातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सातत्याने सुरू राहते. परिणामी याचा त्रास नागरिकांना प्रचंड होतो. भंडारा शहराआधी मुजबी ते शहरा पुढे असलेल्या कारधा अशा 14 किलोमीटर अंतरासाठी बायपास मार्ग निर्माण करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.

या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी भेट घेऊन आणि पत्रव्यवहारातून सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान या सहा पदरी,14 किलोमीटर लांब आणि 421 कोटी रुपये खर्च करून निर्माण केल्या जात असलेल्या बायपास मार्गाचे भूमिपूजन 3 मार्च रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. कारधा चौकात असलेल्या पावर हाउस च्या बाजूला हा भूमिपूजन सोहळा दुपारी 3 वाजता होणार होईल. या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे चे उद्घाटन होणार आहे. शहरातील रेल्वे ग्राउंड येथे हा उद्घाटन सोहळा संध्याकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या क्रीडा महोत्सवात क्रिकेट,कबड्डी,बैलांचा शंकर पट,रस्सीखेच,नोकायान या खेळांचा समावेश असून 26 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत क्रीडा महोत्सव चालणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]