पंढरपूर, 4 मार्च : पंढरपुरातून (Pandharpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
एका तरुण शेतकऱ्याने व्हिडीओ शूट करत विष प्राशन केलं आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणी या सर्वांना कंटाळून तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.
(young farmer commits suicide by doing live video in Pandharpur) सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण शेतकरी असलेल्या सुरज जाधव याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
सुरज याने 2 मार्च रोजी स्वत:च्या शेतात विषारी औषध घेतले. त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
अखेर शुक्रवारी सुरज जाधवने अखेरचा श्वास घेतला.
सुरजने विषारी औषध घेण्यापूर्वी चित्रीत केलेल्या व्हिडीओत “शेतकऱ्यांच्या जन्माला पुन्हा कधी येणार नाही” अस म्हणत सरकारला दोष देत आपली जीवनयात्रा संपवली.
व्हिडीओ शूट करत आत्महत्या आत्महत्या करताना सुरज याने एक व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला होता.
हा व्हिडीओ शूट करताना सुरजने म्हटलं,शेतकऱ्याच्या जन्माला आपण पुन्हा कधीच येणार नाही.
आपलं आयुष्य इथपर्यंतच होतं. आपण शेतकऱ्याच्या जन्माला पुन्हा कधीच येणार नाही.
हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. या आत्महत्येनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं,अतिशय विदारक आणि दुर्दैवी ही घटना आहे.
माहाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती
शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न घेऊन मी कोल्हापुरात आंदोलनाला बसलो आहे. मात्र, पण या मुर्दाड राजकारणाऱ्यांना जाग येत नाहीये.
मी माहाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती करतो असं कुठलंही पाऊल तुम्ही उचलू नका.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा करण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेकडून गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे.
यासोबतच सक्तीची वीज वसुली बंद करावी. रात्र पाळीस शेतीतील सिंगल फेस वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी सुद्धा होत आहे.
…तर व्याज आणि विलंब शुल्क माफ – नितीन राऊत कोरोनाच्या काळात मिटर बंद असल्यामुळे एकाच वेळी वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आली होती.त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
काही ठिकाणी वीज मिटर नसतानाही बिलं आली होती.त्यामुळे महावितरणच्या कारभारावर चहुबाजूने टीका होत होती. अजूनही काही ठिकाणी वीज ग्राहक आपली वीज कनेक्शन कट होऊ नये म्हणून टप्याटप्याने वीज बिल भरत आहे.1 मार्च रोजी जागतिक पर्यटन केंद्र लोणार इथं ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली.यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची घोषणा केली.
‘जर वीज ग्राहकांनी एक-रक्कमी थकबाकी भरले तर सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ केले जाणार आहे.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे,
अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली.
