काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना देशातले इतर पक्ष ओबीसींना मूर्ख बनवत आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निषेध असो ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य
भंडारा ;- जातिनिहाय जनगणना हाच एकमेव उपाय आहे ज्यामुळे सर्व घटक समूहाची सध्याची एकूण सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकीय परिस्थिती कळेल आणि भविष्यातील आरक्षण सवलती वाटा देण्यास व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यात मदत होईल.
जोपर्यंत ओबीसी जातिनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत लोकसंख्येची आकडेवारी करणार नाही महाराष्ट्र राज्यकडे ओबीसी ची सध्याची आकडेवारी उपलब्ध नाही.
आयोगाचा अहवाल नसल्यामुळे महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडू शकली नाही केंद्र सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नाही सूडबुद्धी चे राजकारण करत आहे
त्यांना ओबीसीच्या हिताच्या कुठलाही निर्णय घ्यायचा नाही हे आज मा.सुप्रीम कोर्ट द्वारे स्पष्ट झाले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र सध्या लाखोच्या ओबीसी तरुणांच्या राजकीय भविष्याचा खेळखंडोबा मांडला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य भंडारा यांनी आज एक ठराव पारित करून ठळक भाषेत केंद्र आणि राज्य सरकारला ठणकावले,
महानगरपालिका जिल्हा परिषद,नगर परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत व इतर निवडणुका ओबीसी शिवाय होणार नाही म्हणजे हा ओबीसी बांधवावर होणारा अन्याय आहे,ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य खपवून घेणार नाही.
आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत आम्हाला ओबीसी म्हणून प्रतिनिधित्व मिळवायला पाहिजे.त्यामुळे जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका घेऊ नये आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य कडून होत आहे.
केंद्र सरकारने तात्काळ ओबीसी सहा सर्वांची राष्ट्रीय जातिनिहाय जनगणना करून राज्यातील व देशातील आरक्षणाचा तिडा तात्काळ सोडवावा.
ओबीसी क्रांती मोर्चा मुख्यसंयोजक अध्यक्ष संजय मते,संयोजक जीवन भजनकर,जिल्हाध्यक्ष शोभा बावणकर,शहराध्यक्ष पवन रघुते,तालुकाध्यक्ष सुधीर सार्वे,रंजना गौरी,राजू राखडे,यशवंत सूर्यवंशी पुरुषोत्तम वैद्य,कल्पना नवखरे,मीना तुरस्कर,स्वीटी शेंडे,अरुणा बाहे,सीमा नंदागावडी हे उपस्थित होते.
