Crime 24 Tass

प्रेमप्रकरणातून १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

यवतमाळ :- यवतमाळ शहरातील लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात प्रेमप्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या करून प्रियकराने स्वत:च्या हाताची नस, गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
शुभम बाकल (२३) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. दरम्यान एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात नागरिकांना एक तरुण गंभीर अवस्थेत आढळून आला.

या वेळी नागरिकांनी धाव घेऊन त्याची विचारपूस केली असता, त्याने एका तरुणीची हत्या केल्याचे सांगितले. दरम्यान तेथीलनागरिकांनी याबाबत लोहारा पोलिसांना कळवले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथकाने घटनस्थळी दाखल होत जखमी तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तरुणीची शोधमोहीम राबवली. या वेळी त्या तरुणाने चक्क दगडाने ठेचून तरुणीची हत्या केल्याचे समोर आले.

प्रेमप्रकरणातून शुभम बाकल याने तरुणीची दगडाने ठेचून हत्या केली, तर स्वत: हाताची नस कापत गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मृत विद्यार्थिनीची लोहारा एमआयडीसी पॉवर हाऊस परिसरात हत्या करण्यात आली होती. या वेळी पोलिसांनी त्या ठिकाणची पाहणी केली असता, तरुणीच्या मृतदेहाजवळ दारूची बाटली पोलिसांना आढळून आली.

त्यामुळे शुभमने मद्यप्राशन केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर रक्ताने माखलेले ब्लेडदेखील पोलिसांना आढळून आले.

तरुणीची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शुभमला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असून सध्या तो उपचार घेत आहे. मारेकरी शुभम याच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]