Crime 24 Tass

अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधमाला कारधा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी भंडारा, 5 मार्च : राज्यात महिला आणि मुली कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. प्रत्येक दिवशी महिला अत्याचाराच्या घटना समोर येताना दिसतात.
महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी राज्य सरकारकडूनही बरेच प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तरीही या घटना कमी होताना दिसत नाही. भंडाऱ्यात तर एका नराधमाने सर्वच सीमा पार केल्या. त्याने अवघ्या पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

पण सुदैवाने मुलगी आरोपीच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरली. अन्यथा फार मोठा अनर्थ घडला असता. या प्रकरणी पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अवघ्या बारा तासात बेड्याही ठोकल्या आहेत.

आरोपी समीर देवदास खोब्रागडे

नेमकं प्रकरण काय? चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरालगत असलेल्या एका गावात घडली आहे. याप्रकरणी कारधा पोलिसांनी आरोपी नराधमाला 12 तासात अटक केली आहे. समीर देवदास खोब्रागडे (वय 32 वर्ष) असं आरोपीचं नाव आहे. पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

संबंधित घटना ही 26 फेब्रुवारीला घडली होती. पीडित पाच वर्षीय चिमुकली ही आपल्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपी नराधम समीर हा तिथे आला.

आरोपी चिमुकलीला चॉकलेट खाऊ घालण्याचं आमिष दाखवून घेऊन गेला.

आरोपी पीडितेच्या ओळखीचा असल्याने ती त्याच्यासोबत जायला तयार होते. आरोपी मुलीला गावाजवळ नवीन घराच्या बांधकामाचं काम सुरु असलेल्या ठिकाणी घेऊन गेला. आरोपीने पीडितेसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव चिमुकलीला झाली.
तिने तातडीने तिथून पळ काढला. पीडितेने भीतीपोटी आपल्या आईला संबंधित घटनेबद्दल काहीच सांगितलं नाही. पण तिने काल (4 मार्च) संध्याकाळी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. पीडितेच्या पालकांना संबंधित प्रकार समजल्यानंतर त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.

त्यांनी तातडीने ग्रमीण पोलीस ठाणे गाठत आरोपीच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाचा गुन्हा नोंद केला. त्यानंतर आरोपीचा शोध सुरु केला. विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रारीनंतर अवघ्या 12 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]