मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनाने तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपीना शहर पोलिसांनी केली अटक…
भंडारा न्यूज : मोठ्या घातपाताच्या उद्देशाने चारचाकी वाहनातुन तलवारी घेऊन फिरणाऱ्या दोन आऱोपीना भंडारा शहर पोलिसांनी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे।अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम सांगितले जात असून दोघे रामटेक निवासी सांगितल्या जात आहे।भंडारा पोलिसांनी चारचाकी वाहनासह दोन तलवारी जप्त केल्या असून वेळीच पोलिसांच्या समय सूचकते मुळे आरोपी वेळीच सापडल्याने मोठा अनर्थ टाळला आहे।

जिल्ह्यात सद्धा भंडारा पोलिसांकडून आल आउट मिशन सुरु असून शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान भंडारा शहरातील शास्त्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती।वरठी कडून वेगवान चारचाकी (क्रमांक MH 14 BX 9034)येताना पोलिसांनी तिला अडवून गाड़ी मधील दोन इसमांची विचारपूस केली।दरम्यान गाडीत बसलेल्या इसमाच्या संशयास्पद हालचाली बघून गाडीची झडती घेतली असता मागील सीट खाली एक मोठी व एक लहान अश्या दोन तलवारी आढळून आल्या।लागलीच आरोपीना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडील दोन तलवारी व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे।भंडारा पोलिसांनी आरोपींविरूद्ध बेकायदेशिररित्या शस्त्र वारण्यासाठी गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करत न्यायालयात हजर केले गेले आहे।पुढील तपास सुरु आहे।भंडारा पोलिसांच्या समयसूचकतेमुळे होणार मोठा घातपात टळला आहे.
