Crime 24 Tass

महिलांच्या संरक्षणाचे स्टेअरिंग सांभाळले ‘दामिनी’ ने

टारगट मुले रडारवर अनेक प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा

सरवर शेख

भंडारा : शाळा महाविद्यालय वा तत्सम सार्वजनिक ठिकाणी महिलांना टारगटांचा त्रास होऊ लागला आहे. या टारगटांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भंडारा येथील दामिनी पथकाने कंबर कसली आहे. किंबहुना दामिनी पथकाची धडकी अनेकांनी घेतली आहे. असे अभिनंदनीय काम भंडाराच्या दामिनी पथकाने केले आहे.

प्रत्येक युवती स्वरक्षणासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी हे दामिनी पथक अविरत कार्यरत आहे. युवतीच नव्हे तर अन्यायग्रस्त महिलांनाही या • पथकाने दिलासा दिला आहे. महाविद्यालयीन परिसरात राहणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त ● लावण्यासाठी या दामिनी पथकावर जबाबदारी आहे. भंडारा जिल्ह्यात एकमेव असलेल्या या दामिनी पथकावर जिल्ह्याभरात होणाऱ्या अन्यायाला वेळीच पायबंद करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरासह शहराच्या बाहेरील निर्जनस्थळी तरुण-तरुणी • फिरताना दिसून येतात किंबहुना अनेकदा मुलींवर अत्याचाराच्या ही घटना घडतात. अशा एकांतवासातील तरुण-तरुणींना त्यांच्या आई-वडिलांच्या समक्ष समज दिली जाते. असे अनेक प्रकरण या दामिनी पथकाने पोहोचले. हाताळलेली आहेत ही भंडारा जिल्ह्यासाठी खरोखरच अभिमानास्पद बाब ठरली आहे.

रोड-रोमिओंचा छेडछाडीला बळी पडलेल्या महिलांना या पथकाकडून मदत देत आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे प्रकरणही दामिनी पथकाने भंडारा शहरात हाताळले आहेत.

विशेष म्हणजे दामिनी पथकात महिला पोलिसांवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आत्महत्येपासून परावृत्त करणे, छेडछाड तक्रारीत मदत करणे, क्योवृद्धांना सहकार्य करणे हे दामिनी पथकाचे कार्य आहे. याशिवाय मनोरुग्ण महिलांना मदत आणि त्यांच्या कुटुंबियांना जाणीव जागृती करून देण्याची महत्त्वाची भूमिका या पथकावर सोपविण्यात आली आहे.

असा दिला पथकाने न्याय

शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील युवतीला एका तरुणाने लग्नाची गळ घातली होती. लग्न न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी टारगट मुलाने तरुणीला दिली होती. या तरुणीने दामिनी पथकाला मदतीची हाक मारली पथक महाविद्यालयात पोहोचले आणि त्या टारगट तरुणाला ताब्यात घेऊन यातून तरुणीची सुटका करण्यात आली. भंडारा शहरालगत असलेल्या पांढराबोडी मार्गावर चार टवाळखोर तरुण एका मुलीची छेड काढीत होते. या माहितीवरून हे पथक घटनास्थळी

पथकाला बघताच टवाळखोर आणि धूम ठोकली. मात्र पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी एकाला पकडून भंडारा पोलिसांच्या स्वाधीन
केले. आणि त्यानंतर तरुणीची सुटका केली. भंडारा शहरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील १६ वर्षीय मुलगी आणि एका तरुणाच्या प्रेमप्रकरणाची ही माहिती या पथकाला देण्यात आली होती. हे प्रेम प्रकरण टोकाला गेले असताना पथकाने दोन्ही कुटुंबीयांना एकत्रित करीत त्यांना समजावून सांगितले आणि सदर प्रेमप्रकरणाचे हे प्रकरण सामोपचाराने मिटविले. असे एक ना अनेक प्रकरणे दामिनी पथकाने हाताळलेले आहेत.

दामिनीत महिला कर्मचाऱ्यांचा भरणा

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत या दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पथकाचे वाहनही महिला पोलीस कर्मचारी चालविण्याची जोखीम पत्करली आहे. या दामिनी पथकाची चालक म्हणून पोलीस शिपाई सुनीता मारबते या सक्षमपणे जबाबदारी सांभाळीत आहेत. तर या पथकाचे प्रमुख म्हणून महिला पोलीस नायक मंगला ठवकर या समर्थपणे त्यांच्यावरील जबाबदारी पार पडत आहेत. त्यांना महिला पोलीस शिपाई हेमलता मलेवार तेवढ्याच ताकतीने सहकार्य करीत आहेत. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून सामाजिक दायित्वातुन समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपाधिक्षक (गृह) विजय डोळस यांचे खंबीर पाठबळ आणि मार्गदर्शन मिळत आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]